Coronavirus In Maharashtra: देशात दिवसभरात ९ हजार ४१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील स्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 01:14 PM2021-12-09T13:14:04+5:302021-12-09T13:22:57+5:30

गेल्या 24 तासांत देशभरात 9,419 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 159 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या दिवसभरात 8,251 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या देशात 94 हजार 742 जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात बुधवारी 893 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1040 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 64 लाख 89 हजार 720 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 11 झाली आहे.

राज्यात सध्या 6286 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 74 हजार 170 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 891 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 63 , 88, 902 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.