Voter ID card मध्ये घरबसल्या बदला आपला पत्ता; पाहा सोपी प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 04:50 PM2021-11-22T16:50:42+5:302021-11-22T16:59:36+5:30

Voter ID card : मतदार ओळखपत्र हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे.

Voter ID card : मतदार ओळखपत्र हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. भारतीय नागरिकांना निवडणूक आयोगाद्वारे देण्यात येणारं हे महत्त्वाचं दस्तऐवज आहे. भारतातील नागरिकांसाठी हे एक ओळखपत्र म्हणून किंवा पत्त्याचा पुरावा म्हणूनही काम करतं.

हे कार्ड केवळ मतदानासाठीच नाही, तर अन्य कामांसाठीही वापरता येतं. भारत निवडणूक आयोगानुसार मतदान करण्यासाठी योग्य असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाकडे वोटर आयडी कार्ड असू शकतं.

लवकर काही राज्यांच्या आणि महानगपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या अन्य ठिकाणी राहण्यास गेले असाल तर तुम्हाला तुमच्या मतदान ओळखपत्रावरही पत्ता बदलणं आवश्यक आहे.

हा पत्ता बदलण्याची प्रक्रिया सोपी आहे. तसंच ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी तुम्ही हा पत्ता बदलू शकता. जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीनं पत्ता बदलायचा असेल तर तुम्हाला फॉर्म भरून आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागतील.

जर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीनं घरबसल्या पत्ता बदलायचा असेल तर तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम www.nvsp.in वर जाऊन लॉग इन करावं लागेल.

जर तुम्ही कोणत्या अन्य मतदान क्षेत्रात राहण्यास गेला असाल तर 'ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू वोटर/ ट्रांसफर फ्रॉम AC टू AC' अंतर्गत फॉर्म 6 वर क्लिक करावं लागेल. जर तुम्ही एकाच मतदान क्षेत्रात दुसरीकडे राहण्यास गेला असाल तर तुम्हाला फॉर्म 8A वर क्लिक करावं लागेल.

या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव, जन्म तारीख, राज्य, क्षेत्र, सध्याचा पत्ता अशी आवश्यक माहिती भरा. यापैकी ईमेल, मोबाइल क्रमांक अशी काही माहिती ही ऑप्शनल आहे. परंतु ही माहितीदेखील भरणं कामाचं आहे.

यानंतर तुमचा फोटो, पत्त्याचा पुरावा आणि वयाचा पुरावा अशी आवश्यक ती माहिती अपलोड करा. यानंतर आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन फॉर्म सबमिट करा. त्यानं डिक्लेरेशन ऑप्शन भरा आणि कॅप्चा टाका. त्या ठिकाणी दिसणारी डिटेल्स व्हेरिफाय करून सबमिट टॅबवर क्लिक करा.

Read in English