Aadhaar Card New Rules: कोणाला आधार कार्डाची फोटोकॉपी पाठवत असाल तर सावधान!, सरकारनं जारी केली नवी अॅडव्हायझरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 02:06 PM2022-05-29T14:06:31+5:302022-05-29T14:18:06+5:30

Aadhaar Card New Rules: केंद्र सरकारनं आधार कार्डाबाबत एक नवी अॅडव्हायझरी जारी केली आहे. पाहा काय म्हटलंय सरकारनं.

Aadhaar Card New Rules: केंद्र सरकारने आधार कार्डबाबत (Aadhar Card) एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. गैरवापर टाळण्यासाठी सरकारने नागरिकांना त्यांच्या आधार कार्डच्या केवळ मास्क्ड प्रतीच अन्य व्यक्तींसोबत शेअर करण्यास सांगितल्या आहे.

"तुमच्या आधार कार्डाची फोटोकॉपी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेसोबत बिनदिक्कतपणे शेअर करू नका. याचा गैरवापर होऊ शकतो,” असं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारनं सांगितलं आहे. रविवारी केंद्र सरकारनं आधार कार्डासंबंधी एक अॅडव्हायझरी जारी केली.

सरकारनं याचा पर्याय देत केवळ मास्क्ड आधारकार्डच शेअर करण्याचा सल्ला दिला आहे. मास्क्ड आधार कार्डावर केवळ अखेरचेच चार डिजिट दिसून येतात.

कोणत्याही विना परवाना खासगी संस्था या हॉटेल्सप्रमाणे आहेत आणि चित्रपटगृहांना आधार कार्डाच्या प्रती एकत्र ठेवण्याची परवानगी नाही, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.

"फक्त ज्या संस्थांनी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून वापरकर्ता परवाना प्राप्त केला आहे, तेच एखाद्या व्यक्तीची ओळख स्थापित करण्यासाठी आधार वापरू शकतात," असं सरकारनं म्हटलं आहे. सरकारनं नागरिकांना त्यांचे आधार कार्ड शेअर करण्यापूर्वी संस्थेकडे UIDAI कडून वैध वापरकर्ता परवाना असल्याची पडताळणी करण्यास सांगितलं आहे.

याव्यतिरिक्त, सरकारने लोकांना त्यांचे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट कॅफेमधील कम्प्युटर्स वापरू नये असा इशारा दिला आहे. "तुम्ही असं केल्यास, कृपया खात्री करा की तुम्ही त्या सिस्टमवरून ई-आधारच्या सर्व डाउनलोड केलेल्या प्रती कायमस्वरूपी हटवल्या आहेत," असंही सरकारनं आपल्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटलंय.