Loadsheding: 'लोडशेडींग' ही महाराष्ट्राची अस्मिता, भन्नाट मिम्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 02:43 PM2022-04-12T14:43:37+5:302022-04-12T15:16:53+5:30

यातच उन्हाळ्यामुळे विजेचा वापर वाढल्याने ऐन उन्हाळ्यात काही प्रमाणात लोडशेडिंग सुरु झाले आहे. येणाऱ्या काळातील वीज टंचाई आणि लोडशेडिंग यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माहिती दिली.

राज्यात वीज उपलब्ध होत नसल्याने व्होल्टेज मेंटेन करणेही त्रासदायक होत आहे. त्यामुळे, सध्या लोडशेडिंग थोड्याफार प्रमाणात सुरू झाले आहे. नागरिकांनी थोडी झळ सहन करावी, अशी अपेक्षा ऊर्जामंत्री नितीन राउत यांनी व्यक्त केली.

एका कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथे असताना मंत्री राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे.

यातच उन्हाळ्यामुळे विजेचा वापर वाढल्याने ऐन उन्हाळ्यात काही प्रमाणात लोडशेडिंग सुरु झाले आहे. येणाऱ्या काळातील वीज टंचाई आणि लोडशेडिंग यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, राज्यात विजेचा तुटवडा आहे. एकीकडे विकत घायची म्हटली तर बाजारात विजेची उपलब्धता नाही. यासोबतच वीज विकत घेण्यासाठी पैसाही लागतो. वीज ग्राहकानी बिल देण्यास नकार दिला तर संपूर्ण वितरण कोसळेल, अशी शंकाही राऊत यांनी व्यक्त केली.

राज्यात ऐन उन्हाळ्यात लोडशेडींग सुरू करण्यात आल्याने राज्यातील नागरिक, शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. त्यातून, अनेक मिम्स व्हायरल होत आहे.

एकीकडे इंधन दरवाढीमुळे इलेक्ट्रीक वाहन खरेदी केली, दुसरीकडे वीजेचा तुटवडा निर्माण झाल्याने आता ही इलेक्ट्रीक स्कुटर चालविण्यासाठी जनरेटर वापरावे लागतंय आणि त्यासाठी डिझेलचा लागतंय, असाही मेसेज फिरत आहे.

मिम्स व्हायरल करताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टिका करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बंद असलेलं लोडशेंडीग पुन्हा सुरू होत असल्याचं म्हटलं जातंय.

महावितरणने काय म्हटलंय ते या ग्राफिक्समध्ये दिलं आहे.

राज्यातील जनतेला लोडशेडिंगच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. तर, लोडशेडींग ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, अशा आशयाचे मिम्सही व्हायरल होत आहेत.

महावितरणची एकूण विजेची करारीत क्षमता ३७,९०० मेगावॅट असून त्यापैकी स्थापित क्षमता ३३७०० मेगावॅट इतकी असून त्यापैकी एकूण २१०५७ मेगावॅट (६२%) औष्णिक विद्युत क्षमता आहे.