जगातल्या सर्वात जुन्या बंगल्याची केली जात आहे विक्री, सुंदर इतका की बघतच रहाल; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 12:28 PM2021-12-29T12:28:34+5:302021-12-29T12:42:15+5:30

World's oldest bungalow : हा बंगला विक्री असल्याची बातमी समोर येताच इंटरनेटवर जगभरात याचे फोटो ट्रेन्ड करत आहेत. हा बंगला पूर्ण झाल्यावर यात इंग्रज सर्जन प्रोफेसर विल्सम यांनी इंटरेस्ट दाखवला होता. (All Photo Credit : Cascade)

जगातील सर्वात जुना बंगला प्रॉपर्टी बाजारात विक्रीसाठी तयार आहे. जगातील हा सर्वात जुना बंगला ब्रिटनच्या केंट भागात आहे. ज्याची किंमत २० कोटी रूपये लावण्यात आली आहे. इंग्रजांच्या शाही अंदाजाचं प्रतिक राहिलेल्या या ग्रेड २ लिस्टेड बंगल्यात बेडरूम आहेत.

या लक्झरी बंगल्याचं निर्माण १८७४ मध्ये करण्यात आलं होतं. हा बंगला प्रसिद्ध आर्किटेक्ट जॉन टेलर यांनी बांधला होता. टेलर तेच होते ज्यांनी लंडन, चॅथम आणि डोवर रेल्वेच्या अनेक स्टेशन्सना हॉलिडे होम म्हणून डिझाइन केलं होतं.

तशी तर या बंगल्याची एक खासियत नाही. अनेक दृष्टीने हा बंगला खास आहे. हा बंगला सी बीचवर आहे. यातील काही बेडरूम एखाद्या क्रूजप्रमाणे सी फेसिंग आहेत. जगातील हा सर्वात जुना बंगला ब्रिटनमधील नॅशनल हेरिटेज म्हणून घोषित आहे.

हा बंगला विक्री असल्याची बातमी समोर येताच इंटरनेटवर जगभरात याचे फोटो ट्रेन्ड करत आहेत. हा बंगला पूर्ण झाल्यावर यात इंग्रज सर्जन प्रोफेसर विल्सम यांनी इंटरेस्ट दाखवला होता.

महाराणी व्हिक्टोरियाने विल्सनला १८८१ मध्ये नाइटच्या उपाधीने सन्मानित केलं होतं. त्यावेळी त्यांची नावलौकिक काही मोजक्याच स्किन सायन्स स्पेशालिस्ट म्हणून होतं. त्यांनी टेलरने डिझाइन केलेल पहिले चार बंगले स्वत: खरेदी केले होते.

प्रोफेसर विल्सन यांना वाटत होतं की, असा बंगला कोणत्याही परिवारासाठी स्वच्छता आणि सौंदर्याचं सर्वश्रेष्ठ मॉडल होऊ शकतो. त्यावेळी त्यांनी लिहिलं होतं की, बंगल्यांचा विचार लोकांच्या मनाला सुखावतो. पण हा बंगला स्वच्छता आणि सौंदर्याच्या दृष्टीने एखाद्या कादंबरीत वर्णन केलेल्या चित्राप्रमाणे आहे.

१५० वर्षाआधी अशा एक मजली बंगल्याचं चनल ब्रिटनमध्ये मानाचं मानलं जात होतं. श्रीमंत लोकांमध्ये असे बंगले नेहमीच पॉप्युलर होते. अनेक वर्षाआधी यांना हॉलिडे होम म्हणून सादर केलं गेलं होतं. जेणेकरून लोक वीकेंड इथे येऊन काही वेळ बंगल्यात राहू शकतील आणि अनुभवू शकतील.

या बंगल्यात एक मोठी डायनिंग रूम आणि शानदार किचन आहे. मेन रिसेप्शनसमोर लॉन आहे. तेच मागच्या खोल्यांमध्ये सुंदर खिडक्या आहेत. इस्टेट एजन्ट म्हणाले की, हा बंगला गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध आहे.