Kiss करताना डोळे बंद का होतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 02:02 PM2023-03-21T14:02:31+5:302023-03-21T14:11:13+5:30

Kiss Facts: अनेक सिनेमात दाखवलं जातं की, किसींग सीन दरम्यान अभिनेत्री आपले डोळे बंद करते, पण तुम्ही कधी विचार केलाय का की, असं का होतं?

Kiss Facts: किस (Kiss) आपल्या जोडीदारासोबत प्रेम व्यक्त करण्याची सगळ्यात चांगली पद्धत मानली जाते आणि असं म्हटलं जातं किसमुळे पाटनर्समधील अंतर दूर होतं आणि दोघांना जवळ आणतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, किस करताना डोळे का बंद होतात?

अनेक सिनेमात दाखवलं जातं की, किसींग सीन दरम्यान अभिनेत्री आपले डोळे बंद करते, पण तुम्ही कधी विचार केलाय का की, असं का होतं? यामागचं कारण काय असतं?

किस करताना डोळे आपोआप बंद होतात, पण असं का होतं? आज आम्ही तुम्हाला यामागचं वैज्ञानिक कारण सांगणार आहोत की, किस करताना डोळे बंद का होतात.

किस करताना डोळे बंद होण्यावरून लंडन यूनिव्हर्सिटी (University of London) च्या रॉयल होलोवे (Royal Holloway) ने एक स्टडी केला होता. ज्यात असा खुलासा करण्यात आला आहे की, असं 'सेंस ऑफ टच' मुळे होतं.

मनोवैज्ञानिक सॅंड्रा मर्फी आणि पोली डाल्टन यांनी 'सेंस ऑफ टच' बाबत सांगितलं की, याने पार्टनर्समध्ये एकमेकांच्या फार जवळ आल्यावर फिलिंग जागृत होते.

रिसर्चनुसार, किस करताना डोळे बंद होण्याचा अर्थ हा आहे की, पार्टनर्स एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवले आहेत आणि त्यामुळेच डोळे बंद होतात. तेच जर डोळे उघडे असेल तर बाहेरच्या गोष्टींवर लक्ष जातं. त्यामुळे ते एकमेकांमध्ये हरवू शकत नाहीत.

लंडन यूनिव्हर्सिटी (University of London) रिसर्च दरम्यान काही वाचण्याचा टास्क देण्यात आला होता. पण लोकांना यात खूप अडचणी आल्या. रिसर्चमधून खुलासा झाला की, डोळे उघडे असल्याने लोक 'सेंस ऑफ टच' प्रति कमी सेन्सिटिव्ह होते. कारण त्यांचा मेंदू एकावेळी दोन गोष्टींवर फोकस करू शकत नव्हता.