Cruise Ship रिटायर झाल्यावर त्याचं काय केलं जातं? वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 11:16 AM2022-10-11T11:16:35+5:302022-10-11T11:21:41+5:30

What Happens When Cruise Ships Retire : एक वेळ अशीही येते जेव्हा या क्रूजना रिटायर व्हावं लागतं. पण जेव्हा एका क्रूज जहाजाला रिटायर केलं जातं तेव्हा त्यांचं काय होतं? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

What Happens When Cruise Ships Retire : रोज शेकडो क्रूज जहाज जगाच्या एका देशातून दुसऱ्या देशात जात येत असतात. हे मोठे जहाज असतात जे एक अनेक लोकांना घेऊन जातात. पण एक वेळ अशीही येते जेव्हा या क्रूजना रिटायर व्हावं लागतं. पण जेव्हा एका क्रूज जहाजाला रिटायर केलं जातं तेव्हा त्यांचं काय होतं? चला जाणून घेऊ याचं उत्तर...(All Image Credit > Social Media)

30 ते 40 वर्षानंतर होतात रिटायर - साधारणपणे एक क्रूज जहाज 30 ते 40 वर्षानंतर रिटायर होतं. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना रिटायर केलं जातं. कारण ते एका काळानंतर व्यवस्थित सेवा देऊ शकत नाहीत.

विकले जातात - मोठ्या शिपिंग कंपन्या त्यांच्या रिटायर झालेल्या क्रूज जहाजांना छोट्या कंपन्यांना विकतात. त्यानंतर छोट्या कंपन्या काही वर्ष चालवण्यासाठी त्यांची दुरूस्ती करतात आणि त्यांचा वापर करतात.

टूरिस्ट डेस्टिनेशन - काही जुन्या जहाजांना टुरिस्ट डेस्टिनेशन बनवलं जातं. पण हे फार कमी बघायला मिळतं. असे अनेक जहाज आहेत जे टुरिस्टना बघण्यासाठी ठेवले जातात. एका मोठ्या सेवेनंतर एलिजाबेथ 2 जहाजाला दुबईत एक तरंगत हॉटेल म्हणून वापरलं जातं.

नष्ट केलं जातं - अनेक जुन्या जहाजांना मागणी कमी असते. त्यामुळे त्यांना नष्ट करण्यासाठी विकलं जातं. यासाठी हे जहाज Ship Breaking Yard मध्ये पाठवले जातात. जहाज नष्ट करणारे जास्तीत जास्त शिपयार्ड तुर्की, भारत आणि पाकिस्तानात आहेत. भारतातील अलंग हे सगळ्यात मोठं शिपयार्ड मानलं जातं. जहाज नष्ट करण्याआधी कंपनी जहाजातील काही मजबूत वस्तू काढतात आणि ते विकतात.

काही जहाज असे सोडले जातात - काही जहाज असे असतात ज्यांना शांतीपूर्ण रिटायरमेंट मिळत नाही. ते त्यांच्या जुन्या बॉडीसह समुद्राच्या एका कोपऱ्यात पडलेले असतात. American Star आणि World Discover जहाज़ असेच सोडले होते. त्यांचा अपघात झाला होता.

डाइवर्स स्पॉटसाठी बुडवले जातात - रिटायरमेंटनंतर काही जहाजांना मुद्दामहून बुडवलं जातं. जेणेकरून डाइवर्स स्पॉट तयार व्हावा. असं डाइवर्ससाठी कुत्रिम डोंगर बनवण्यासाठी केलं जातं. यासाठी जास्त नेव्हीचे जहाज वापरले जातात.