दात काळे करण्याची अजब परंपरा, याचा इतिहास आणि महत्व वाचून व्हाल अचंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:31 IST2025-10-09T15:19:02+5:302025-10-09T15:31:31+5:30
Teeth blackening : आजकाल ही प्रथा जवळजवळ संपलेली आहे, पण काही दक्षिण-पूर्व आशियातील आदिवासी समुदायातील वृद्ध महिला अजूनही याचे पालन करतात.

जगभरातील देशांमध्ये वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, रिती-रिवाज बघायला मिळतात. त्याबाबत आपण नेहमीच ऐकत असतो. लग्नाबाबत तर काहीच्या काही प्राचीन प्रथा आहेत. त्यातीलच एक अजब प्रथा म्हणजे दात काळे करणे. दात काळे करण्याची परंपरा प्राचीन जपान, भारत आणि दक्षिण-पूर्व आशियात बघायला मिळत होती. ही प्रथा समाजात सौंदर्य, परिपक्वता आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक मानली जात होती. या आता मागे पडलेल्या परंपरेचं सांस्कृतिक, आरोग्यदायी आणि ऐतिहासिक महत्व इंटरेस्टींग आहे. आज आपण तेच पाहणार आहोत.
प्राचीन काळात दात काळे करणं म्हणजे मेकअप नव्हतं. तर ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा होती. जपानमध्ये या परंपरेला ‘ओहागुरो’ असे म्हणतात, आणि ती मुख्यपणे विवाहित महिला, समुराई आणि अभिजात वर्गामध्ये प्रचलित होती.
या प्रक्रियेचा एक मुख्य उद्देश होता तो म्हणजे दातांचे संरक्षण. दात काळे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मिश्रणात लोहाचे घटक आणि वनस्पतींचे टॅनिन असायचे, जे दांतांचं वेगवेगळं नुकसान टाळायचे. भारतात या मिश्रणाला "मिस्सी" नावानं ओळखलं जातं. ज्यात आयर्न सल्फेट आणि औषधी वनस्पतींचा समावेश असायचा.
वेगवेगळ्या देशात या प्रथेचा उद्देश वेगळा होता. जसे की, जपानमध्ये समुराई आणि अभिजात्य वर्गाद्वारे सौंदर्य आणि परिपक्वतेचे प्रतीक. व्हिएतनाममध्ये विवाहयोग्य झाल्यावर युवतींनी ही प्रक्रिया स्वीकारली होती. लाओस, थायलॅंड, फिलिपिन्समधील हिल ट्रायब्सच्या महिलांमध्ये ही परंपरा सौंदर्य आणि सामाजिक मानाने केली जात असे.
जपानमध्ये दात काळे करण्यासाठी लोखंडाची बारीक पावडर व्हिनेगरमध्ये मिक्स करून काळं मिश्रण वापरले जात असे, ज्याला ‘कनेमिज़ु’ म्हणतात. यात कधी कधी गालनट पावडर, चहाची पाने आणि मसाले (जसे दालचिनी, लवंग) घातले जात होते.
१८७० मध्ये जपानमध्ये सरकारने ओहागुरोला अधिकृतरित्या बंदी घातली, कारण पश्चिमात्य सौंदर्य कल्चरचा प्रभाव वाढू लागला. खासकरून येथील राजकुमारीने सार्वजनिक ठिकाणी काळे न केलेले दांत आणि नैसर्गिक भुवया दाखवल्या, ज्यामुळे सांस्कृतिक बदल दिसून आला. हळूहळू ही प्रथा केवळ नाटके, सण आणि गीशा परंपरेपुरती मर्यादित राहिली.
जपानी लोककथांमध्ये ओहागुरोचे उल्लेख आढळून येतात, जसे की ‘बेट्टारी’, ज्यात काळे दांत असलेली महिला भूतासारखी दिसते, परंतु चेहरा फीचरलेस असतो. ही कथा या परंपरेच्या सांस्कृतिक प्रभावाची आणि खोलपणाची साक्ष आहे.
आजकाल ही प्रथा जवळजवळ संपलेली आहे, पण काही दक्षिण-पूर्व आशियातील आदिवासी समुदायातील वृद्ध महिला अजूनही याचे पालन करतात.