एक असं गाव जिथे लोक कपडे न घालताच राहतात, 90 वर्ष जुनी आहे ही परंपरा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 05:15 PM2022-08-11T17:15:24+5:302022-08-11T17:24:50+5:30

लोक गेल्या 90 वर्षांपासून एक परंपरा पाळतात आणि कपडे न घालताच राहतात. हैराण झालेत ना...आज आम्ही तुम्हाला अशाच एका अजब गावाबाबत सांगणार आहोत.

Unique Village In Britain: जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे अजब लोक बघायला मिळतात. सामान्यपणे सगळीकडे लोक कपडे घालून राहतात किंवा घरातून बाहेर कपडे घालूनच निघतात. पण एक असं गाव आहे जिथे लोक गेल्या 90 वर्षांपासून एक परंपरा पाळतात आणि कपडे न घालताच राहतात. हैराण झालेत ना...आज आम्ही तुम्हाला अशाच एका अजब गावाबाबत सांगणार आहोत.

तुम्ही कधी अशा गावाबाबत ऐकलंय का जिथे लोक विना कपडे राहतात? बरं असं अजिबात नाही की, तेथील लोक गरिब आहेत किंवा त्यांच्याकडे पैसे नाहीत. ही तिथली अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. ब्रिटनमध्ये एक सीक्रेट गाव आहे. जिथे लोक वर्षानुवर्षे कपडे न घालताच राहतात. मिररच्या रिपोर्टनुसार, गावात दोन बेडरूम असलेले बंगले आहेत. ज्यांची किंमती लाखो रूपये आहे.

गावातील लोकांकडे सर्व प्रकारच्या मुलभूत सुखसोयी सुद्धा आहेत. पण परंपरा आणि मान्यतांनुसार येथील लोक कपडे न घालताच राहतात. हर्टफोर्डशायरच्या स्पीलप्लाट्स गावात केवळ वयोवृद्धच नाही तर लहान मुलंही कपड्यांविनाच राहतात. स्पीलप्लाट्स ज्याच अर्थ जर्मनीत खेळाचं मैदान असा होतो.

हर्टफोर्डशायर हे गाव ब्रिटनच्या सर्वात जुन्या कॉलनींपैकी एक आहे. इथे केवळ घरेच नाही तर शानदार स्वीमिंग पूल, लोकांना पिण्यासाठी बीअरसारखी सुविधाही आहे. हे ठिकाण गेल्या 90 वर्षांपासून असंच आहे.

स्पीलप्लाट्स गावात जीवनाचा आनंद घेणाऱ्यांमध्ये 82 वर्षीय इसेल्ट रिचर्डसन हेही आहेत. त्यांच्या वडिलांनी 1929 मध्ये या समुदायाची स्थापना केली होती. त्यांनी जोर देऊन सांगितलं होतं की, निसर्गाच्या सानिध्यात आणि रस्त्यावर राहणाऱ्या लोकांमध्ये कोणतंही अंतर नाही.

या ठिकाणावर जगभरातील लोकांनी डॉक्यूमेंट्री आणि शॉर्टफिल्म्सही बनवल्या आहेत. इथे पोस्टमॅन आणि सुपरमार्केट डिलिव्हरी करणारे लोक नेहमीच येत असतात.