या देशांमध्ये सेटल होण्यासाठी दिले जातात पैसे आणि व्हिसा, जाणून घ्या लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 10:51 AM2023-08-18T10:51:11+5:302023-08-18T11:04:40+5:30

एखाद्या दुसऱ्या देशात जाऊन स्थायीक होणं काही सोपं नाही. अनेक देशांची नागरिकता मिळवणं फार अवघड असतं. पण आज आम्ही तुम्हाला काही अशा देशांबाबत सांगण्यात आहोत जिथे जाणं सोपं काम आहे.

World News : आजकाल मोठ्या प्रमाणात लोक आपला देश सोडून परदेशात स्थायीक होत आहेत आणि दिवसेंदिवस हा ट्रेंड अधिक वाढत आहे. आपला देश सोडण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात जसे की, शिक्षण, नोकरी. पण एखाद्या दुसऱ्या देशात जाऊन स्थायीक होणं काही सोपं नाही. अनेक देशांची नागरिकता मिळवणं फार अवघड असतं. पण आज आम्ही तुम्हाला काही अशा देशांबाबत सांगण्यात आहोत जिथे जाणं सोपं काम आहे. या देशांमधील जास्तीत जास्त लोकसंख्या ही 40 वयापेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे देश आता तरूणांना आपल्या देशात स्थायीक होण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देत आहेत.

ऑस्ट्रिया - जर तुम्हालाही दुसऱ्या देशात स्थायीक व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ऑस्ट्रिया एक पर्याय ठरू शकतो. येथील सरकार अशा लोकांना आर्थिक व इतर मदत करते ज्यांना इथे येऊन काम करायचं असेल. या योजनेनुसार, 41,56,825 रूपये आणि एक वर्षाचा व्हिसा मिळतो.

डेनमार्क - डेनमार्कमध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी उद्योजकांना मदत केली जाते. एका प्रोग्राम द्वारे अशा लोकांना मोठी रक्कम, इतर मदत आणि एक वर्षाचा व्हिसा दिला जातो.

आयरलॅंड - आयरलॅंडच्या सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे अशा लोकांची मदत केली जाते ज्यांना इथे बिझनेस सुरू करायचा आहे. त्यांना यासाठी चांगली आर्थिक मदत आणि एक वर्षाचा व्हिसाही दिला जातो.

इटली - इटलीतील सरकारने एका योजनेद्वारे अशा विद्यार्थांना आणि अभ्यासकांना पैसे आणि मदत प्रदान केली आहे ज्यांना इथे येऊन रिसर्च करायचा आहे. या योजनेनुसार, 8,31,324 रूपये आणि एक वर्षाचा व्हिसा दिला जातो.

पोर्तुगाल - पोर्तुगाल सरकारने स्टार्टअप व्हिसा प्रोग्राम द्वारे देशात व्यवसाय सुरू करण्याची ईच्छा असणाऱ्या उद्योजकांना मदत सुरू केली आहे. यात आर्थिक मदत तेली जाते. एक वर्षाचा व्हिसा दिला जातो.

पोंगा, स्पेन- स्पेन सरकारच्या एका कार्यक्रमाद्वारे देशात स्थायी होण्यासाठी 50,000 डॉलर पर्यंतची मदत केली जाते आणि एक वर्षाचा व्हिसा दिला जातो. ही सुविधा त्यांना मिळते ज्यांना या देशात बिझनेस सुरू करायचा आहे.

अल्बिनेन, switzerland - switzerland च्या या गावात 250 पेक्षाही कमी लोक राहतात. हेच कारण आहे की, येथील सरकार इथे स्थायीक होण्यासाठी लोकांना आर्थिक मदत केली जाते. परिवारासोबत इथे स्थायीक होण्यासाठी प्रत्येक वयस्क व्यक्तीला 23,63,098 रूपये आणि प्रत्येक लहान मुलाला 9,45,239 रूपये दिले जातात. पण यासाठी काही अटी असतात. जर तुमच्याकडे स्विस नागरिकता असेल किंवा परमनंट रेसिडेंस परमिट असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो.

एंटीकिथेरा, ग्रीस - हे ग्रीसमधील एक बेट आहे. इथे 50 पेक्षाही कमी लोक राहतात. ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च इथे लोकांना स्थायीक होण्यासाठी मदत करतं. इथे स्थायीक होणे किंवा लोकसंख्या वाढवण्यास मदत करणाऱ्यांना 3 वर्षासाठी साधारण 45241 रूपयांची मासिक स्टायपेंड दिली जाते.