मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील सर्वाधिक स्फोटक फलंदाजी असलेल्या सनरायर्झस हैदराबादने आज निराश केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:10 PM2024-05-21T21:10:59+5:302024-05-21T21:16:40+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 KKR vs SRH, Qualifier 1 Live Marathi : KKR DOMINATING IN THIS QUALIFER 1, Mitchell Starc picked 3 Wickets, SENSATIONAL FIFTY FOR RAHUL TRIPATHI, SRH all out on 159 runs | मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला

मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 KKR vs SRH, Qualifier 1 Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील सर्वाधिक स्फोटक फलंदाजी असलेल्या सनरायर्झस हैदराबादने आज निराश केले. कोलकाता नाईट रायडर्सच्या मिचेल स्टार्कने ( MITCHELL STARC ) पहिल्या स्पेलमध्येच ३ धक्के देऊन SRH ला अडचणीत आणले. राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि हेनरिच क्लासेन यांनी KKR च्या गोलंदाजांसमोर शड्डू ठोकला होता. पण, त्यांना शेवटपर्यंत मैदानावर उभे राहता आले नाही.  कर्णधार पॅट कमिन्सच्या अखेरच्या षटकांतील योगदानामुळे हैदराबाद सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचले. 

SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 


२४.७५ कोटींचा गोलंदाज मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला आणि  पाचव्या षटकात नितीश रेड्डी ( ९) व शाहबाज अहमद ( ०) यांना सलग दोन चेंडूंवर माघारी पाठवले. वैभव अरोराने दुसऱ्या षटकात हैदराबादचा दुसरा सलामीवीर अभिषेक शर्माला ( ३) बाद करून संघाला मजबूत पकड मिळवून दिली.  पॉवर प्लेमध्ये हैदराबादची अवस्था ४ बाद ४५ अशी दयनीय झाली होती.  जीवदान मिळालेला त्रिपाठी आणि क्लासेन यांनी ३७ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले होते. पण, वरुण चक्रवर्थीने ही जोडी तोडली.  क्लासेन २१ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३२ धावांवर बाद झाला.   


त्रिपाठीने कोलकाताची डोकेदुखी वाढवली होती. पण, १३व्या षटकात अब्दुल समद व त्रिपाठी यांच्यात समन्वयाचा अभाव दिसला. त्रिपाठी ३५ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५५ धावांवर रन आऊट झाला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून हैदराबादने सनवीर सिंगला पाठवले, परंतु नरीनने चतुराईने त्याचा त्रिफळा उडवला. अब्दुल १२ चेंडूंत १६ धावांवर हर्षित राणाला विकेट देऊन माघारी परतला. भुवनेश्वर कुमारला भोपळ्यावर वरुण चक्रवर्थीने पायचीत केले. वरुणने २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. कर्णधार पॅट कमिन्सने २४ चेंडूंत ३० धावा केल्या. हैदराबादचा ंसंघ १९.३ षटकांत १५९ धावांवर माघारी परतला. 

Web Title: IPL 2024 KKR vs SRH, Qualifier 1 Live Marathi : KKR DOMINATING IN THIS QUALIFER 1, Mitchell Starc picked 3 Wickets, SENSATIONAL FIFTY FOR RAHUL TRIPATHI, SRH all out on 159 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.