चालतं-फिरतं घर पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 01:15 PM2018-10-16T13:15:51+5:302018-10-16T15:21:55+5:30

निसर्गाच्या सान्निध्यात एक सुंदर घर घेणं हे प्रत्येकाच स्वप्न असतं. कधीकधी काही कारणांमुळे ते शक्य होत नाही. मात्र आता टेंशन घेण्याची गरज नाही. कारण अशी काही घरं आली आहेत जी तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता.

106 स्वेअर फूटाचं हे सुंदर चालतं-फिरतं घर आहे. अमेरिकेमध्ये अशा घरांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

लाकूड आणि फायबरचा वापर करून हे घर तयार करण्यात आले आहे. या घरामध्ये तुम्ही तुमचं ऑफिसही करू शकता.

सुंदर घरांची किंमत ही 19000 युरो आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार ती जवळपास 16 लाख इतकी आहे.

जास्त किमतीची घरं परवड नसल्याने परदेशात अशा स्वरुपातील घरांकडे लोकांचा कल वाढला आहे.

कमी किमतीत हव्या त्या जागी घरं घेऊन जाणं शक्य असल्याने अनेकांसाठी ही घर फायदेशीर आहेत. भविष्यात भारतात ही अशी सुंदर घरं पाहायला मिळू शकतात.

टॅग्स :घरHome