हे फोटो पाहाच, लहानपण आठवल्याशिवाय राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 12:50 PM2019-07-29T12:50:43+5:302019-07-29T12:56:07+5:30

दूरदर्शन पाहात काही पिढ्या मोठ्या झाल्या. तेव्हा रविवारी बच्चेकंपनी शक्तीमान पाहण्यासाठी १५ मिनिटं आधीच टीव्हीसमोर ठाण मांडून बसायची.

आता आपण डिजिटलच्या जमान्यात आलो आहोत. पण हा मेसेज अनेकांना आजही आठवत असेल.

अनेकांना ही कसरत आजही आठवत असेल...

सध्याची पिढी टूथपेस्ट वापरते. मात्र काही पिढ्या हा डबा पाहून आजही भूतकाळात जातील.

प्ले स्टेशन अन् पबजीचा जमाना आहे. पण एक पिढी विटीदांडूसारखे खेळ खेळत मोठी झाली.

सध्या पबजीमध्ये शत्रूवर निशाणा साधला जातो. पण एक पिढी अशीही होती जिनं बेचकीनं चिंचा पाडल्या आहेत.

या गोळ्या खाताना मिळणारा आनंद स्वर्गीय होता.

किती जणांना लगोरी खेळायला आवडायचं?