डायनॉसोरच्या युगात होता हा विशाल प्राणी, वैज्ञानिक अजूनही शोधू शकले नाही त्यांच्याबाबतचं पूर्ण रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 04:52 PM2020-06-12T16:52:23+5:302020-06-12T17:06:39+5:30

हा प्राणी आजपासून साधारण तीन कोटी 70 लाख वर्षाआधी पृथ्वीवर वावरत होते. हे इतके मोठे होते की, आजचे गेंडेही त्यांच्यासमोर लहान वाटतील. चला जाणून घेऊ या प्राण्यांबाबत...

हे तर तुम्हाला माहीत असेलच की, शेकडो वर्षांपूर्वी पृथ्वीवर विशाल प्राणी असायचे. डायनॉसोरबाबत तर जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. पण आज आम्ही तुम्हाला एक अशा प्राण्याबाबत सांगणार आहोत ज्याला जगातला सर्वात मोठा स्तनधारी प्राणी म्हणता येईल.

हा प्राणी आजपासून साधारण तीन कोटी 70 लाख वर्षाआधी पृथ्वीवर वावरत होते. हे इतके मोठे होते की, आजचे गेंडेही त्यांच्यासमोर लहान वाटतील. चला जाणून घेऊ या प्राण्यांबाबत...

या प्राण्याचं नाव आहे 'पॅरासेराथेरियम'. मुळात हा प्राणी गेंड्याचीच एक प्रजाती होता. हे प्राणी तेव्हाच लुप्त झाले. त्यांची त्वचाही गेंड्यांप्रमाणे जाड आणि कठोर होती. ज्यावर बंदुकीने गोळी मारली तरी काही झालं नसतं.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, इतका विशाल प्राणी असूनही हे प्राणी शाकाहारी होते. त्यामुळे इतर छोटे प्राणी त्यांना घाबरत नव्हते. उलट त्यांच्यासोबत फिरत होते.

पॅरासेराथेरिअमची उंची साधारण 26 ते 40 फूट होती. तर यांचं वजन साधारण 15 ते 20 टन असायचं. या प्राण्याची खास बाब म्हणजे यांची मान जिराफासारखी लांब होती. पण अजूनही वैज्ञानिकांच्या यांच्याबाबत पूर्णपणे माहिती मिळू शकली नाही. कारण या प्राण्याचा संपूर्ण अवशेष अजून सापडला नाही.

पॅरासेराथेरियमचा जीवाश्म सर्वातआधी 1846 इसवीमध्ये पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये सापडला होता. तसेच याचा अवशेष चीन आणि रशियासहीत अनेक पश्मिची देशांमध्ये आढळून आले. आजही यांची माहिती शोधली जात आहे.

हे प्राणी पृथ्वीवरून लुप्त कसे झाले याबाबत असे मानले जाते की, जवळपास एक कोटी 10 वर्षांआधी हे आशिया आणि पश्मिची यूरोपच्या क्षेत्रांमध्ये जिवंत होते. पण नंतर जलवायु परिवर्तन आणि कमी प्रजनन यामुळे पृथ्वीवरून लुप्त झालेत.