बम बम भोले! नागा साधुंची रहस्यमय दुनिया, साधू कसे बनतात नागा साधू वाचून व्हाल थक्क....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 11:48 AM2021-02-03T11:48:00+5:302021-02-03T11:58:11+5:30

नागा साधू वेळोवेळी आपली जागा बदलत असतात. त्यामुळे त्यांच्या ठिकाणाचा पत्ता लागणं अवघड असतं. हे लोक गुप्त ठिकाणी राहून तपस्या करतात.

कुंभमेळ्यात सर्वात जास्त आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतात ते नागा साधू. नागा साधुंचं जीवन हे इतर साधुंच्या तुलनेत जास्त कठीण असतं. याचा संबंध शैव परंपरेच्या स्थापनेशी मानला जातो. चला जाणून घेऊ नागा साधू आणि कसं असतं त्यांचं जीवन....

१३ आखाड्यांमधून तयार केले जातात नागा साधू - कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या १३ आखाड्यांमधून सर्वात जास्त नागा साधू जूना आखाड्यातून तयार केले जातात. नागा साधू तयार करण्याआधी त्यांना अनेक परीक्षांचा सामना करावा लागतो. त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराची चौकशी केली जाते. त्यांना अनेक वर्षे आपल्या गुरूंची सेवा करावी लागते. सोबतच आपल्या इच्छांचा त्याग करावा लागतो.

कसे तयार होता नागा साधू - इतिहासात नागा साधुंचं अस्तित्व सर्वाज जुनं आहे. नागा साधू बनण्यासाठी महाकुंभ दरम्यान प्रक्रिया सुरू केली जाते. यासाठी त्यांना ब्रम्हचर्याची परीक्षा द्यावी लागते. यात ६ महिने ते १२ वर्षांचा वेळ लागू शकतो. ब्रम्हचर्याची परीक्षा पास केल्यानंतर व्यक्तीला महापुरूषाचा दर्जा दिला जातो. त्यांच्यासाठी पाच गुरू भगवान शिव, भगवान विष्णु, शक्ती, सूर्य आणि गणेश निर्धारित केले जातात. त्यानंतर नागा साधुंचे केस कापले जातात. कुंभ दरम्यान या लोकांना गंगा नदीत १०८ डुबक्या माराव्या लागतात.

महापुरूषानंतर बनतात अवधूत - महापुरूषानंतर नागांची अवधूत बनण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यांना स्वत: त्यांचं श्राद्ध करून पिंडदान कराव लागतं. यादरम्यान साधू बनणाऱ्या लोकांना २४ तास विना कपडे आखाड्याच्या ध्वजाखाली उभं रहावं लागतं. परीक्षेत पास झाल्यनंतर त्यांना नागा साधू बनवलं जातं.

कुठे बनवले जातात नागा साधू - कुभं मेळ्याचं आयोजन हरिद्वारमध्ये गंगा, उज्जैनमध्ये शिप्रा, नाशिकमध्ये गोदावरी आणि इलाहाबादमध्ये गंगा, जमुना आणि सरस्वतीचा संगम होतो तिथे होतं. त्यामुळे नागा साधू बनण्याची प्रक्रिया याच चार जागांवर केली जाते. मान्यता आहे की, या चार ठिकाणांवर अमृताचे थेंब पडले होते. तेव्हापासून आजपर्यंत कुंभाचं आयोजन या चार ठिकाणी केलं जातं.

नागा साधुंची नावे - वेगवेगळ्या स्थानांवर नागा साधुंची दीक्षा घेणाऱ्या साधुंना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. इलाहाबाद, प्रयागराजमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना नागा म्हणतात. हरिद्वामध्ये दीक्षा घेणाऱ्यांना बर्फानी नागा म्हणतात. उज्जैनमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खूनी नागा म्हणतात. तेच नाशिकमद्ये दीक्षा घेणाऱ्यांना खिचडिया नागा म्हणतात.

शरीरावर लावतात राख - नागा साधू बनल्यानंतर हे सगळे लोक आपल्या शरीरावर मृत व्यक्तीची राख शुद्ध करून लावतात. जर मृत व्यक्ती राख नसेल तर हवनातील राख लावतात.

जमिनीवर झोपतात - नागा साधू गळ्यात आणि हातात रूद्राक्ष व फुलांच्या माळा घालतात. नागा साधुंना केवळ जमिनीवर झोपण्याची परवानगी असते. ते उशीही घेऊ शकत नाहीत. नागा बनल्यानंतर त्यांना सर्व नियमांचं पालन करणं अनिवार्य असतं.

नागा साधुंचं जीवन फार रहस्यमय असतं. कुंभमेळ्यानंतर ते कुठेतरी गायब होतात. असे म्हटले जाते की, नागा साधु जंगलाच्या मार्गाने रात्री उशीरा प्रवास करतात. त्यामुळे ते कुणाला दिसत नाहीत.

नागा साधू वेळोवेळी आपली जागा बदलत असतात. त्यामुळे त्यांच्या ठिकाणाचा पत्ता लागणं अवघड असतं. हे लोक गुप्त ठिकाणी राहून तपस्या करतात.