Priyanka Gandhi : "मी तुम्हाला धक्का देईन, ओरडेन, पळायला लावेन..."; प्रियंका गांधींनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 03:27 PM2024-05-08T15:27:41+5:302024-05-08T15:38:49+5:30

Lok Sabha Election 2024 And Priyanka Gandhi : प्रियंका गांधी सोमवारी रायबरेलीमध्ये पोहोचल्या. गेल्या दोन दिवसांत त्यांनी भूएमऊ गेस्टहाऊसवर स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या.

Priyanka Gandhi to Congress workers in raebareli sclod yoy push you lok sabha elections 2024 | Priyanka Gandhi : "मी तुम्हाला धक्का देईन, ओरडेन, पळायला लावेन..."; प्रियंका गांधींनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं

Priyanka Gandhi : "मी तुम्हाला धक्का देईन, ओरडेन, पळायला लावेन..."; प्रियंका गांधींनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं

काँग्रेसच्याअमेठी आणि रायबरेली या दोन हायप्रोफाईल जागांवर पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रियंका गांधी उमेदवार नसल्या तरी दोन्ही ठिकाणी त्या पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांचे भाऊ राहुल गांधी हे रायबरेलीमधून उमेदवार आहेत, तर गांधी घराण्यातील जवळचे किशोरी लाल शर्मा अमेठीतूनकाँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. प्रियंका गांधी आज प्रचार मोहिमेची सुरूवात करून नऊ सभा घेणार आहेत. 

प्रियंका गांधी सोमवारी रायबरेलीमध्ये पोहोचल्या. गेल्या दोन दिवसांत त्यांनी भूएमऊ गेस्टहाऊसवर स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या. सोमवारी झालेल्या बैठकीत प्रियंका गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगितलं की, 18 मे पर्यंत त्या रायबरेलीतून जाणार नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात रायबरेली आणि अमेठी या दोन्ही ठिकाणी 20 मे रोजी मतदान होणार आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, "प्रियंका गांधी म्हणाल्या की, आपल्याला अमेठी आणि रायबरेलीमधून जोरदार लढायचं आहे. आता तुमचे 24 तास माझे आहेत. मी तुम्हाला धक्का देईन, ओरडेन, पळायला लावेन, पण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी 24 तास उघडे असतील, ही निवडणूक संविधान वाचवण्यासाठी आहे. भाजपाला तुमच्याकडून आरक्षणाचा लाभ हिसकावून घ्यायचा आहे."

1952 मधील पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून, काँग्रेसचा रायबरेलीमध्ये फक्त तीन वेळा पराभव झाला आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपा आणि मोदी लाट असूनही रायबरेलीची जागा जिंकण्यात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यशस्वी ठरल्या. यावेळी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि राज्यसभेवर गेल्या. 

काँग्रेसने यावेळी आपल्या पारंपारिक बालेकिल्ल्यातून राहुल गांधींना उभं करण्याचा निर्णय घेतला आहे, या जागेचे प्रतिनिधित्व एकेकाळी फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी सध्या रायबरेलीमधून उत्तर प्रदेशचे मंत्री दिनेश प्रताप सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत, ज्यांना 2019 च्या निवडणुकीत सोनिया गांधींकडून 1.67 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव पत्करावा लागला होता.
 

Web Title: Priyanka Gandhi to Congress workers in raebareli sclod yoy push you lok sabha elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.