"तुझ्याशिवाय मजा नाही", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला रामराम केल्यानंतर गौरव मोरेचे चाहते नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 12:13 PM2024-05-08T12:13:18+5:302024-05-08T12:27:25+5:30

गौरव मोरेची हास्यजत्रेतून एक्झिट, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

"आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टा ना टा ना" असं म्हणत गौरव हास्यजत्रेच्या मंचावर एन्ट्री घ्यायचा. फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेल्या गौरवला हास्यजत्रेमुळे प्रसिद्धी मिळाली.

गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलेल्या गौरवने आता मात्र हास्यजत्रेतून एक्झिट घेतली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला रामराम केल्यानंतर गौरव मोरेचे चाहते नाराज आहेत.

गौरवने पोस्ट शेअर करत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो सोडल्याचं सांगतिलं आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

"तुझ्याशिवाय हास्यजत्रेत मजा नाही. But all the best. असेच हसवत रहा कारण तुम्ही ज्या स्किट, एपिसोड मध्ये असताना मजा फक्त तिथेच येते", अशी कमेंट एकाने केली आहे.

"तुला नेहमी मिस करू, पुन्हा हास्यजत्रेत येणार ना?", अशी कमेंटही केली आहे.

"पण, कधी कधी हास्यजत्रेत येत जा...तुझी कॉमेडी आणि तुला मिस करतो", असंही म्हटलं आहे.

गौरवच्या नव्या वाटचालीसाठी चाहत्यांनी त्याला कमेंटमधून शुभेच्छाही दिल्या आहेत.

गौरव सध्या 'मॅडनेस मचाऐंगे दुनिया को हसायेंगे' या हिंदी कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

अनेक कॉमेडी शोमध्ये काम केलेल्या गौरवला हास्यजत्रेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर अनेक मराठी सिनेमांमध्येही तो झळकला.