भारतातल्या 'या' मंदिरात तेलाने नाही तर पाण्याने लावतात दिवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 04:13 PM2019-12-26T16:13:10+5:302019-12-26T16:32:35+5:30

भारतात अनेक ठिकाणी आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात. लोकांच्या अनेक श्रध्दा आणि मान्यता आहेत. त्यातून भारतातील अनेक धार्मिक स्थळांवर वेगवेगळ्या दैवी चमत्कारांचे दर्शन घडत असते. अशाच एका धार्मीक स्थळाबद्दल तुम्हाला माहीती देणार आहोत.

भारतातल्या मध्यप्रदेश या राज्यातील एका ठिकाणी चक्क तेलाने नाही तर पाण्याने दिवे लावले जातात.

माध्यामांनी दिलेल्या माहीतीनुसार मध्यप्रदेशमधील शाजापूर जिल्ह्यातील गाडीयाघाट वाली माताजी या नावाचे एक प्रसिध्द मंदिर आहे.

कालीसिंध या नदिच्या किनारी मालवापासून काही अंतरावर असलेल्या नालखेडा या गावापासून १५ किलोमीटरच्या अंतरावर हे गाडीया गाव आहे.

असं मानलं जात की या मंदीरात पाच वर्षांपासून महाज्योत म्हणजेच दिवा जळत आला आहे. भारतात अशी अनेक मंदिरं आहेत ज्याठिकाणी खूप पूर्वीपासून नेहमी दिवा जळत असल्याची समजूत आहे.

या मंदिरातील पुजारींच्यामते या मंदिरात जळणारी जी ज्योत आहे तिच्यात कोणत्यही प्रकारचं तेल, मेण, किंव कोणतीही संसाधनं घातली जात नाहीत.पुजारी सिद्धूसिंह असं सांगतात की अनेक वर्षींपूर्वी त्यांच्या स्वप्नात देवी आली होती. आणि त्या देवीने पाणी घालून त्यांना दिेवे लावण्यास सांगितले. त्यामुळे अनेक वर्षीपासून मंदिरातील पुजारींनी पाणी घालून दिवे लावण्याचं कार्य सुरू ठेवले आहे.