Jara Hatke: कुणी जिभेने थांबवला पंखा, तर कुणी दिला मोठ्ठा ढेकर; २०२१ मध्ये बनले हे हटके विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 03:53 PM2021-12-19T15:53:35+5:302021-12-19T16:06:20+5:30

Unusual Guinness World Records 2021: आज आपण नजर टाकूया या वर्षात घडलेल्या काही अजब गजब विक्रमांवर. यातील काही विक्रमांबाबत ऐकल्यावर तुम्ही आश्चर्याने तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही.

सन २०२१ आता अखेरच्या टप्प्यात आहे. सरत्या वर्षातील घटनांचा आता आढावा घेतला जात आहे. आज आपण नजर टाकूया या वर्षात घडलेल्या काही अजब गजब विक्रमांवर. यातील काही विक्रमांबाबत ऐकल्यावर तुम्ही आश्चर्याने तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून मास्कचा वापर अनिवार्य झाला आहे. दरम्यान, जॉर्ज पील नावाच्या व्यक्तीने मास्कचा वापर करून अजब विक्रम केला आहे. त्याने असा सराव केला की, त्याने केवळ ७.३५ सेकंदांमध्ये आपल्या तोंडावर १० मास्क लावले आणि विश्वविक्रम रचणाऱ्यांमध्ये आपले नाव कोरले.

उंची कमी असो वा जास्त हिंमत मोठी असली पाहिजे. भारतीय बॉडीबिल्डर प्रतीक विठ्ठल मोहितेने ही गोष्ट सत्य करून दाखवली. ३ फूट चार इंच उंचीचा २६ वर्षीय प्रतीक विठ्ठल हा जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर ठरला आहे.

या अजब गजब रेकॉर्डच्या यादीमध्ये पुढचा विक्रम आहे तोही वैशिष्टपूर्ण आहे. Zoe Ellis या महिलेने हा विक्रम केला आहे. तिने आपल्या जिभेने वेगाने चालणारा पंका रोखून दाखवण्याची किमया केली आहे.

ऑस्ट्रेलियातील डार्विनमध्ये राहणारी नेव्हिले शार्प ही व्यक्ती ढेकरामुळे जगप्रसिद्ध ठरली आहे. त्याचा ११२.४ डेसिबल आकाराचा ढेकर हा कुठल्याही इलेक्ट्रिक ड्रिलपेक्षा अधिक असू शकतो. ४५ वर्षीय नेविले याने पत्नीच्या सांगण्यावरून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी अर्ज केला होता.

आपण फार तर एक दोन मिनिटे श्वास रोखू शकतो. पण क्रोएशियाच्या बुदमीर नावाच्या व्यक्ती पाण्याखाली दीर्घकाळ श्वास रोखण्याचा विक्रम केला आहे. ५६ वर्षीय बुदमीर यांनी पाण्याखाली तब्बल २४ मिनिटे ३७ सेकंदांपर्यंत श्वास रोखून धरला. आधीचा विक्रमही त्यांच्यात नावावर होता. तेव्हा त्यांनी २४ मिनिटे ०३ सेकंद श्वास रोखून ठेवला होता.