गावात तीन महिने सूर्यप्रकाश पडत नव्हता; गावकऱ्यांनी थेट स्वतःचा कृत्रित सूर्य तयार केला, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 02:13 PM2024-01-14T14:13:58+5:302024-01-14T14:18:58+5:30

गावकऱ्यांनी या समस्येवर शोधून काढलेला तोडगा पाहून तज्ञही चकीत झाले.

इटलीतील विग्नेला गाव एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला पर्वतांनी वेढलेले आहे. थंडीच्या महिन्यात गावात सूर्यप्रकाशदेखील पोहोचत नाही. थंडी आणि अंधारामुळे संपूर्ण शहरात स्मशान शांतता असते. येथील नागरिकांना सूमारे तीन महिने सूर्य बघायला मिळत नाही. पण, या लोकांनी मिळून या समस्येवर असा तोडगा काढला, तो पाहून भले-भले तज्ञ चक्ती झाले आहेत.

इटलीतील विग्नेला या छोट्याशा गावाl सूर्यप्रकाश पोहोचत नव्हता, म्हणून गावकऱ्यांनी चक्क त्यांचा वैयक्तिक(पर्सनल) सूर्य तयार केला. यापूर्वी चीनने सूमारे एक लाख कोटी रुपये खर्चून कृत्रिम सूर्य तयार केल्याची चर्चा होती. पण, इटलीतील या छोट्या गावातील गावकऱ्यांनी यापेक्षाही कमी खर्चात हा कृत्रिक सूर्य तयार केला आहे.

कृत्रिम सूर्याची काय गरज?-13व्या शतकात विग्नेला येथे वसाहत सुरू झाली. विग्नेला स्वित्झर्लंड आणि इटलीच्या सीमेवर आहे. येथे फार कमी लोकसंख्या राहते. हे शहर एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला पर्वतांनी वेढलेले आहे. थंडीच्या महिन्यात येथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही. या इटालियन गावातील लोक 11 नोव्हेंबरला वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहतात. यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे 2 फेब्रुवारीला सूर्य दिसू लागतो.

800 वर्षांपासून हे लोक या समस्येशी झगडत होते. पण 1999 मध्ये परिस्थिती बदलू लागली. विग्नेला येथील स्थानिक वास्तुविशारद गियाकोमो बोन्झानी यांनी चर्चच्या भिंतीवर सनडायल बसवण्याचा प्रस्ताव दिला. सनडायल हे एक साधन आहे, जे सूर्याच्या स्थितीवरून वेळ सांगते. मात्र तत्कालीन महापौर फ्रँको मिडाली यांनी हा प्रस्ताव लावला आणि सनडायलऐवजी वर्षभर सूर्यप्रकाश मिळेल असे काहीतरी तयार करण्यास सांगितले.

अशा प्रकारे सुटला प्रश्न -बोन्झानी यांनी शहराच्या वरच्या एका शिखरावर एक महाकाय आरसा बसवण्याची योजना आखली. यामुळे सूर्याची किरणे आरशातून परावर्तित होऊन शहराच्या मुख्य चौकात पडू लागली. बोन्झानी आणि अभियंता जियानी फेरारी यांनी मिळून आठ मीटर रुंद आणि पाच मीटर लांबीचा महाकाय आरसा तयार केला. ते तयार करण्यासाठी 1,00,000 युरो (सुमारे 1 कोटी रुपये) खर्च आला. हा प्रकल्प 17 डिसेंबर 2006 रोजी पूर्ण झाला. मिररमध्ये एक विशेष सॉफ्टवेअर प्रोग्राम देखील आहे. सॉफ्टवेअरमुळे, आरसा सूर्याच्या मार्गानुसार फिरतो.

अशा प्रकारे वरच्या बाजूला बसवलेल्या विशाल आरशातून दिवसातून सहा तास सूर्यप्रकाश शहरात परावर्तित होऊ लागला. हा कृत्रिम प्रकाश नैसर्गिक सूर्यप्रकाशाइतका शक्तिशाली नाही. परंतु ही व्यवस्था मुख्य चौक गरम करण्यासाठी आणि शहरातील घरांना थोडा सूर्यप्रकाश देण्यासाठी पुरेशी आहे. उन्हाळ्याच्या काळात ही यंत्रण झाकलेली असते.