फ्रान्समध्ये कंडोम फ्री'मध्ये का वाटतात? याचे कारण लोकसंख्या नियंत्रण नाही, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 06:59 PM2023-01-02T18:59:45+5:302023-01-02T19:07:32+5:30

फ्रान्समध्ये तरुणांना मोफत कंडोमचे वाटले जात आहेत.

फ्रान्समध्ये तरुणांना मोफत कंडोमचे वाटले जात आहेत. या उपक्रमात 25 वर्षांपर्यंतच्या तरुणांचा समावेश करण्यात आला आहे.

फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारने रविवारपासून तरुणांना मोफत कंडोमचे वाटण्याचा निर्णय घेतला आहे. याअगोदर 18 ते 25 वयोगटातील तरुणांचा समावेश करण्याचे नियोजन होते. पण नंतर वाद वाढला तेव्हा त्यात 18 वर्षांखालील अल्पवयीन मुलांचाही यात समावेश करण्यात आला.

उपक्रमाच्या माध्यमातून युवक फार्मसी, फ्रेंच युवा ग्रुप आणि शाळा-कॉलेजमधून कंडोम घेऊ शकतात. मॅक्रॉन सरकारने गेल्या महिन्यात याची घोषणा केली होती. आता याचं खरं कारण समोर आले आहे.

फ्रान्समधील या उपक्रमाची सुरुवात फक्त पुरुषांच्या कंडोमसाठी आहे, महिलांसाठी नाही. 'फ्रान्स लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत चांगले काम करत नाही. सध्याची परिस्थिती विचारसरणीपेक्षा खूपच वेगळी आहे.

याबाबत देशातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अशा बाबतीत गंभीर होण्याची गरज आहे.फ्रान्स सरकारचा हा निर्णय केवळ लोकसंख्या थांबवण्यासाठी नाही, असं राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले.

फ्रान्सने अनेक गोष्टी लक्षात घेऊन तरुणांना मोफत कंडोम वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लैंगिक संबंधातून पसरणारे आजार रोखणे. '2021 मध्ये एचआयव्हीचे 5000 नवीन रुग्ण आढळले. यामध्ये 15 टक्के असे लोक होते ज्यांचे वय 26 वर्षांपेक्षा कमी होते. याशिवाय, फ्रान्समध्ये आणखी एक मोठी समस्या आहे, असं पब्लिक हेल्थ फ्रान्सच्या अहवालात म्हटले आहे.

नको असलेली गर्भधारणा ही देखील फ्रान्समध्ये दीर्घ काळासाठी मोठी समस्या आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोफत कंडोमचे वाटप करण्याचे पाऊल उचलले आहे.

'या समस्यांबद्दल लोकांना शिक्षित करण्याची गरज आहे जेणेकरून ते थांबवता येतील. हे नवीन उपक्रमाचे ध्येय आहे, असं राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले.

जगात असे अनेक देश आहेत जिथे कंडोमबाबत वेगवेगळे नियम आहेत. यात आफ्रिकन देश स्वाझीलँडमध्ये कंडोमवर बंदी आहे. तर असे अनेक देश आहेत जिथे त्याचा वापर केला जात नाही. यात नायजेरिया, फिलीपिन्स, झांबिया आणि इंडोनेशिया. असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे या देशांमध्ये एड्ससारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :आरोग्यHealth