Pakistan Flood : पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 15:35 IST2025-08-29T15:27:28+5:302025-08-29T15:35:33+5:30

Pakistan Flood : मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. सैन्याच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात मुसळधार पाऊस पडत आहे. पंजाब प्रांतात आलेल्या पुरामुळे १० लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले. प्रांतीय आपत्ती प्राधिकरणाने सांगितलं की, मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. सैन्याच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. फोटो - रॉयटर्स

पंजाबमध्ये १.६७ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले. ४० हजारांनी स्वेच्छेने घरं सोडली. ८०२ लोकांचा मृत्यू झाला. पिकं उद्ध्वस्त झाली, रस्ते बंद झाले. चिनाब नदीला पूर आला आहे. भारताने काश्मीरमधील धरणातून पाणी सोडलं, ज्यामुळे पुराचा इशारा दिला. फोटो: रॉयटर्स

मुसळधार पावसामुळे पाकिस्तानमध्ये १० लाख लोक विस्थापित झाले, तर भारताने इशारा देऊन मदत केली. हवामान बदलामुळे अशा समस्या वाढतील, म्हणून करार मजबूत करणं महत्त्वाचं आहे. फोटो: एपी

पाकिस्तानने यासाठी भारताला दोष दिला, परंतु हा मान्सूनचा एक भाग आहे. लाहोर आणि इतर शहरं पाण्याखाली आहेत. पाकिस्तानने वाळूच्या पिशव्या टाकल्या, पण पाण्याने त्या वाहून गेल्या. २०२२ मध्ये आलेल्या पुराची आठवण करून देणारा हा पूर आहे. फोटो: रॉयटर्स

पाकिस्तानमध्ये गुडघ्यापर्यंत चिखल असलेला पाहायला मिळत आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानी रेंजर्स गुडघ्यापर्यंत पाण्यात उभे असल्याचं दिसून आलं आहे. फोटो: रॉयटर्स

पाकिस्तानने ग्रँड ट्रंक रोड (जीटी रोड) च्या उंचीला दोष दिला आहे, ज्यामुळे पाणी वाहत आहे आणि त्यांच्या बाजूला साचत आहे असं म्हटलं. परंतु सत्य हे आहे की भारताने आधीच पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आणि चांगले ड्रेनेज व्यवस्थापन लागू केले आहे, ज्यामुळे पाणी साचू शकलं नाही. फोटो: रॉयटर्स

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सततच्या मुसळधार पावसाचा सामना करत आहे. त्यांच्या बाजूचा परेड परिसर चिखलाच्या पाण्यात बुडाला आहे. काही ठिकाणी वाळूच्या पिशव्या टाकण्यात आल्या आहेत. फोटो: रॉयटर्स

वाघा बॉर्डरवर ही घटना भारत-पाकिस्तान तणाव वाढवू शकते. पावसामुळे पाकिस्तानमधील जनजीवन विस्कळीत झालं असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फोटो: एपी