व्हायरल MMS मुळे प्रसिध्दी! भारताविरूद्ध बरळल्याने चर्चेत; पाकिस्तानात मॉडेलची भलतीच क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 03:52 PM2023-12-17T15:52:16+5:302023-12-17T15:55:42+5:30

पाकिस्तानमधील टॉप १० सर्चच्या यादीत हरीम पहिल्या क्रमांकावर आहे.

भारताविरोधात बरळणारी पाकिस्तानची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हरीम शाह गुगल सर्च लिस्टमध्ये अव्वल आली आहे. २०२३ मध्ये ती पाकिस्तानमध्ये सर्वाधिक सर्च केलेला व्यक्ती ठरली आहे.

पाकिस्तानमधील टॉप १० सर्चच्या यादीत हरीम पहिल्या क्रमांकावर आहे. हरीम शाहने भारतातील हिंदू देवी-देवतांवर आक्षेर्पाह विधान केले होते.

याशिवाय हरीम शाहने भारताच्या मून मिशन चांद्रयान-३ च्या लँडिंगवरही बेताल वक्तव्य केले होते. भारताविरूद्ध बरळताना तिने म्हटले होते की, चांद्रयान-३ वर खर्च झालेला पैसा भारताने शौचालय बांधण्यासाठी वापरायला हवा होता.

२०२३ मध्ये पाकिस्तानातील लोकांनी गुगलवर हरीम शाहला सर्वाधिक वेळा सर्च केले. भारताविरूद्ध बरळणारी हरीम तिच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असते.

हरीमने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या खुर्चीवर बसून एक व्हिडीओही बनवला होता. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात घुसून तिने व्हिडीओ केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

याच वर्षी एप्रिलमध्ये तिचा एक आक्षेर्पाह MMS व्हिडीओही व्हायरल झाला होता. हरीम शाहने आरोप केला होता की, ती आंघोळ करत असताना तिच्या एका जुन्या मित्राने एमएमएस लीक केला.

हरीम शाहचे इंस्टाग्रामवर ३ लाख ४० हजार फॉलोअर्स आहेत. बोल्ड अन् ग्लॅमरस फोटो पोस्ट करून हरीम प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करते.

हरीम प्रसिद्धीसाठी कोणत्या थराला जाईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. तिने पाकिस्तानातील एका मंत्र्यावर देखील गंभीर आरोप केले होते.