India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 04:20 PM2020-06-27T16:20:06+5:302020-06-27T16:54:45+5:30

लाडाखमध्ये चीनच्या आक्रमक हालचाली वाढल्यानंतर, चीन भारतासह अेनेक देशांसाठी धोकादायक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी घोषणा केली, की चीनी सैन्याचा सामना करण्यासाठी अमेरिका आशिया खंडातील सैनिकांच्या तैनातीत वाढ करणार आहे. यामुळे आता चीन जबरदस्त घेरला जाणार आहे.

लाडाखमध्ये भारत चीनला जशास-तसे उत्तर देत आहे. असे असतानाच, आता अमेरिकाही चीनची मस्ती जिरवण्यसाठी उघडपणे समोर आला आहे.

भारत आणि आपल्या इतर मित्र देशांसाठी चीन धोकादायक असल्याचे म्हणणाऱ्या पोम्पियो यांनी, वेळ आलीच तर अमेरिकेचे सैनिक पीपल्स लिब्रेशन आर्मीचा सामना करायला तयार आहे, असे म्हणत, चीनला थेट इशाराच दिला आहे.

अमेरिकेचा हा पोकळ इशारा नाही, तर चीनच्या जवळपासच अमेरिकेचे एवढे बेस आहेत, की अमेरिकन सैन्य ड्रॅगनला सहजपणे गुडघे टेकायला भाग पाडू शकते. अमेरिकेने आधिपासूनच तैवानजवळ आपले तीन न्युक्लिअर एअरक्राफ्ट कॅरिअर्स तैनात केले आहेत. यापैकी दोन तैवान आणि इतर मित्र राष्ट्रांसोबत युद्धाभ्यास करत आहेत. तर तिसरे एअरक्राफ्ट कॅरिअर जपानजवळ गस्त घालत आहे.

प्रशांत महासागरात अमेरिकेचे, यूएसएस थियोडोर रूझवेल्ट, यूएसएस निमित्झ आणि यूएसएस रोनाल्ड रीगन, हे तीन विमान कॅरिअर्स तैनात आहेत.

एका अंदाजानुसार, आशिया खंडात चीनच्या चारही बाजूने 2 लाखहून अधिक अमेरिक सेन्य तैनात आहे. तसेच पॉम्पियो यांच्या वक्तव्यानंतर चीनची घेराबंदी अधिक मजबूत केली जात आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नर्देशनंतर जर्मनित असलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या 52 हजारहून 25 हजार करण्यात येत आहे. येथील सैनिक आता आशियाखंडात चीनचा सामना करण्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत.

अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, अमेरिकेचे जगभरात तब्बल 800 सैन्य ठिकाणं आहेत. चीनला घेरण्यासाठी मालदीवमध्ये डियेगो गार्सिया येथे अमेरिका आणि इंग्लंडच्या नौदलाचा बेस आहे. याशिवाय, सिंगापूर, तैवान, दक्षिण कोरिया, गुआम आणि जपानमध्येही अमेरिकेची सैन्य ठिकाणं आहेत. जपानमध्ये 10 वेग-वेगळ्या बेसवर एक लाखहून अधिक अमेरिकन सैन्य तैनात आहे. अमेरिका येथूनच दक्षिण चीन समुद्रावर लक्ष ठेवत असते.

या ठिकानांशिवाय अेमेरिकेने छोट-छोट्या बेटांवरही आपली ठिकाणं तयार केली आहेत. यातील काही कृत्रीम आहेत. अमेरिकेच्या या गराड्यामुळे चीन नेहमीच अस्वस्त असतो. इतर काही देशांमध्येही अमेरिकेची सैन्य ठिकाणं आहेत. कारण यातील बहुतांश देश अमेरिकेचे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी अमेरिकेवर आहे. कारण चीन भारताबरोबरच या देशांसाठीही धोका बनला आहे. यामुळे, अमेरिकेने चीनला घेरणे सुरू केले आहे.

जापानसोबत अमेरिकेचा करार आहे आणि दुसऱ्या महायुद्धापासूनच तेथे अमेरिकन नौदल, लष्कर आणि एअरफोर्स तैनात आहे.

उत्तर कोरियापासून दक्षिण कोरियाचा बचाव करण्यासाठी अमेरिकेने तेथेही आपले सैनिक तैनात केले आहेत. तर फिलिपीन्सने अमेरिकेसोबतचा 20 वर्षांपूर्वीचा करार वाढवून अमेरिकन सेन्याला आपल्या देशात तैनात करण्याची मंजुरी दिली आहे.

या देशांशिवाय माइक पोम्पियो यांनी, व्हिएतनाम, मलेशिया आणि इंडोनेशियाच्या सुरक्षिततेचा हवाला देत, त्यांच्या सोबतही उभे राहण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच जपान आणि अमेरिकेच्या युद्धाभ्यासानंतर तीळपापड झालेल्या चीनचा ताप अधिक वाढला आहे.