अमेरिकेला ‘हार्वे’चा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 07:40 AM2017-08-31T07:40:21+5:302017-08-31T07:46:58+5:30

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण वादळ असलेल्या हार्वे चक्रीवादळाने टेक्सास भागाला तडाखा दिला आहे.

या चक्रीवादळामुळे परिसरात मुसळधार पाऊस आणि महापुराचा फटका बसला आहे.

गेल्या पाच दिवसांत चक्रीवादळामुळे ३० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.

हार्वे चक्रीवादळाचा लाखो लोकांना तडाखा बसला असून हजारो लोक बेघर झाले आहेत.

येथील प्रशासनाने आतापर्यंत १३ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

याचबरोबर, मदतकार्य करण्या-या हजारो टीम सध्या रहिवाशांना वाचविण्यासाठी अविरत काम करीत आहेत.

चक्रीवादळामुळे येत्या काळातही आणखी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.