ऑस्ट्रेलियात वन्यजीव भस्मसात, पर्यावरणाचं महत्व आलं लक्षात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 11:34 AM2020-01-06T11:34:41+5:302020-01-06T11:40:33+5:30

आगीनंतर अगदी कुटुंबातील सदस्यामुळे या शेकरू प्राण्यानं माणसाला मिठी मारलीय, ही जादू की झप्पी पाहून गहिवरल्याशिवाय राहत नाही

ऑस्ट्रेलियात लागलेल्या भयंकर आगीच्या झळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचल्या. या आगीत भस्मसात झालेल्या प्राणी अन् पक्षांचे छायाचित्र पाहून कोट्यवधींचे ह्रदय पिघळले.

कोट्यवधी नागरिकांनी निसर्गाकडे, देवाकडे तेथील स्थिती आटोक्यात यावा म्हणून प्रार्थना केली. तर, ऑस्ट्रेलियातील नागरिकांनीही एकत्र येत देवाचा धावा केला.

ऑस्ट्रेलियात दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने जंगलात आगीचा हंगाम सुरू झाला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा जीव गेलाय.

येथील जंगलात लागलेल्या आगीत आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे. या निसर्गचक्राच्या फेऱ्यात जवळपास 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

ऑस्ट्रेलियातील आगीनं मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लाखो कांगारू प्राण्यांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियातील या आगीतील मृत्यूमुखी पडलेल्या वन्यजीवाचे फोटो पाहून जगभरातून वेदना व्यक्त झाल्या. तर, कित्येकांनी सोशल मीडियातून भावन व्यक्त केल्या.

पर्यावरणाला जर आपण आज वाचवू शकलो नाही तर भविष्यात पृथ्वीवरील मानवीय जीवन संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही.

निसर्गापुढे कुणाचंच काहीही चालू शकत नाही, ऑस्ट्रेलियातील आगीचे चित्र अत्यंत बोलके आहे.

आगीत मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांची अवस्था मानवाच्या काळजाला भिडणारी आहे. आगीनंतर तेथील वास्तव्यास असलेल्यांना पाण्याची खरी किंमत लक्षात आलीय, म्हणूनच पाऊस पडावा यासाठी देवाची प्रार्थना केली जातेय.

मानवाने झाडांची कत्तल करुन सिमेंटची जंगल बनवली, पण निसर्गाने झाडांच्या केलेल्या हत्येचा बदलाच घेतला की काय? असं वाटतंय. आपण निसर्गचक्राचे पूर्वसंकेत समाजावून घेतले पाहिजे, तसेच पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावली अन् जगवली पाहिजेत.

निसर्ग हाच देव आहे, याची पूजा सर्वांनीच केली पाहिजे, मंदिरामधील देवाला जसे पूजता तसेच पर्यावरणाचे पूजन केले पाहिजे, अशाही भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.