Jeff Bezos: अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांनी केली मृत्यूला मात देण्याची तयारी, वाढत्या वयाला रोखण्यासाठी आखला असा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 03:30 PM2022-01-24T15:30:06+5:302022-01-24T16:23:09+5:30

Jeff Bezos Defeat Death: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले Amazonचे सर्वेसर्वा जेफ बेजोस यांनी सध्या मृत्यूला मात देण्याची तयारी सुरू केली आहे. ते वाढत्या वयाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी अल्टोस लॅब नावाची कंपनी स्थापन केली आहे. ती लोकांना वृद्धत्वापासून वाचवण्यासाठी मदत करेल. तसेच त्यांचा मृत्यू पुढे ढकलण्यावर काम करेल.

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले अॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेजोस यांनी सध्या मृत्यूला मात देण्याची तयारी सुरू केली आहे. ते वाढत्या वयाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी अल्टोस लॅब नावाची कंपनी स्थापन केली आहे. ती लोकांना वृद्धत्वापासून वाचवण्यासाठी मदत करेल. तसेच त्यांचा मृत्यू पुढे ढकलण्यावर काम करेल. या कंपनीसाठी बेजोस यांनी ग्लेक्सोस्मिथक्लाइन कंपनीचे वरिष्ठ शास्रज्ञ हेल बेरॉन यांना आल्टोस लॅबचे प्रमुख बनवले आहे.

वाढत्या वयाचा अर्थ हा नाही की आपण कसे दिसतो किंवा आपण काम कसे करू शकतो. वाढते वय म्हणजे एजिंगची प्रक्रिया ही पेशींच्या पातळीवर तयार होते. प्रौढ व्यक्तीच्या पेशी किमान ५० वेळा विभाजित होते. त्यानंतर विभाजन थांबते. मात्र नवजात बाळांच्या शरीरामध्ये ही प्रक्रिया ८० ते ९० वेळा होते. तर वृद्धांमध्ये पेशींचे विभाजन २० वेळा होते.

त्यानंतर वाढत्या वयाचे कारण हे आपल्या जीन्समध्येही असते. आपले जेनेटिक मटेरियर वेळोवेळी बदलत राहते. त्याच्याशी संबंधित केमिकल त्यात बदलासाठी स्विच ऑव स्विच ऑफ करत राहते. त्याला एपिजेनेटिक बदल म्हणतात. ते आपल्या वाढत्या वयाबरोबर बनत-बिघडत राहते.

तिसरी प्रक्रिया असते आपल्या डीएनएमध्ये. डीएनएमध्ये सातत्याने एकसारखे राहणाऱ्या सेगमेंटला टेलोमियर्स अॅक्ट म्हणतात. ते कुठल्याही चपलाच्या फितीवर बांधलेल्या प्लॅस्टिक कव्हरसारखे असतात. ते डीएनएच्या वळणदार संरचनेला टोकांवर एकमेकांमध्ये गुंतण्यापासून रोखते. मात्र जेव्हा पेशी विभाजित होतात. तेव्हा हे टेलोमीयर्स लहान होतात. मात्र टेलोमीयर्सचे लहान होणे ही वाढत्या वयाची खूण आहे की ती पेशींकडून वाढत्या वयाच्या कार्यप्रणालीचा भाग आहे का हे समजू शकलेले नाही.

जिवंत राहण्यासाठी आणि विभाजनाला रोखण्यासाठी इम्युन सेल्स आपल्या टेलोमीयर्सला लहान होण्यापासून रोखते. जेव्हा ते मल्टिप्लाय करतात. असेच काम कॅन्सरच्या पेशी करतात. हे एक प्रकारच्या अमरत्वाच्या दिशेने एक पाऊल आहे. काही अशी औषधेही आहेत. जी टेलोमीयर्सला त्याचे काम करण्यापासून रोखतात. जी कर्करोगावरील उपचारांसाठी उपयुक्त ठरतात. मात्र काही कॅन्सरच्या पेशी औषधांनाही चकवा देतात.

ही तर प्रक्रियेची बाब आहे. मात्र जेफ बेजोस यांचे नवे शिलेदार हे काम कसे करून दाखवणार, हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. आधी वाढते वय हे कुठल्याही प्रजातीच्या निरंतन विकासाचा भाग आहे, असे मानले जात होते. म्हणजे प्रत्येक प्रजातीला उक्रांतीमधून जावे लागते. त्यासाठी एका जीवाला मरावे लागते, तर दुसऱ्या जीवाला जन्म घ्यावा लागतो. मात्र या मांडणीमधील अडचण म्हणजे पृथ्वीवरील बहुतांश जीव पूर्ण जीवन जगत नाहीत. त्यांची शिकार होते किंवा कुठल्या तरी आजारांमुळे ते मरतात. म्हणजेच कुठलाही जीवाच्या शारीरिक जगण्याच्या क्षमतेचा उत्क्रांतीशी संबंध नसतो.

याबाबत दुसरी मांडणी अशी आहे की, वाढते वय आपल्या मेटाबॉलिज्मचे साईड इफेक्ट आमि सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या प्रभावामुळे होते. जसजसे आपले वय वाढते तसतसे आमच्या शरीरातील जीन्स खराब होऊ लागतात. तसेच वाढते वय हे आपल्याला कॅन्सरपासून वाचवण्यात मदत करते. म्हणजेच जसजशा पेशी जेनेटिक डॅमेजला जमा करत राहतात, त्या शरीरासोबत काम करणे सोडून देतात. त्यामुळेच कोशिका कॅन्सर सेल्समध्ये बदलतात.

जसजसे आपल्या शरीराचे वय वाढते, या प्रक्रियेला सेनेसेन्स म्हणतात. म्हणजेच एक अशी प्रक्रिया ज्यामध्ये पेशी जीवित राहतात. मात्र त्यांचे विभाजन होणे बंद होते. सेनेसेंस कोशिका संपूर्ण जीवनात हळूहळू आपल्या शरीरामध्ये पसरतात. त्या फायदेशीर असतात, तसेच नुकसानकारकही असतात.

त्या फायदेशीर असतात कारण त्या असे रसायन सोडतात. ते खराब उतींमध्ये सुधारणा घडवून आणते. मात्र जर सेनेसेंट कोशिकांची संख्या अधिक असेल तर ते शरीरातील अवयव आणि उतींच्या आकारामध्ये बदल घडवात. याच पेशी वाढत्या वयाशी संबंधित आजारांचे कारण ठरतात. काही दिवसांपूर्वी उंदरावर सेनेसेंट पेशींमध्ये कमी करून पाहिले होते. तेव्हा तो तरुण झाला होता. त्याचे वाढते वय थांबले होते.

मॅंचेस्टर विद्यापीठामध्ये इम्युनोलॉजीचे प्राध्यापक असलेले डॅनियल एम. डेविस यांनी सांगितले की, सध्या जेफ बेजोस यांची नवी अँटी एजिंग कंपनी अल्ट्रोस लॅब कुणाचेही वाढते वय रोखू शकते का किंवा त्याच्या मृत्यूची वेळ पुढे ढकलू शकते का हे कुणालाही माहिती नाही. मात्र हे निश्चित आहे की, वाढत्या वयाबाबत अभ्यास करण्यासाठी एक नवी कंपनी स्थापन करणे त्यामध्ये संशोधन करणे हे मोठे पाऊल आहे.