थंडीच्या दिवसात 'या' भाज्या खाणं ठरेल फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 03:13 PM2020-01-29T15:13:31+5:302020-01-29T15:23:10+5:30

भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. अनेक पोषक घटकांचा समावेश असल्याने आहारात त्याचा समावेश केला जातो. हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला जास्त भाज्या खायला मिळतात.

थंडीच्या दिवसातील वातावरण हे भाज्यांसाठी पोषक असतं. त्यामुळे घरच्या गार्डनमध्ये त्या पिकवता येतात. महिन्याभरात भाजी गार्डनमध्ये तयार होते. थंडीच्या दिवसांत कोणत्या भाज्या खायच्या हे जाणून घेऊया.

थंडीत नेहमीपेक्षा स्वस्त आणि ताजे मटार बाजारात दिसतात. मटार खाल्याने स्मरणशक्ती वाढते. याशिवाय तणाव, डिप्रेशन यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो.

गाजर थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये नक्की खावं.

बीटमध्ये नायट्रेट आणि अनेकप्रकारचे अँ‍टी-ऑक्सिडेंट्स आढळतात. बीटाचा ज्यूस सेवन केल्याने बॉडी डीटॉक्स करण्यास मदत मिळते. याने रक्त शुद्ध होतं आणि लिव्हरही निरोगी राहतं.

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आहे. टोमॅटो त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. ब्लड शुगर नियंत्रणात राहते तसेच पचन शक्ती चांगली राहते.

हिवाळ्यात कांद्याची पात भरपूर येते. त्यामुळे कांद्याची पात खाणे अनेकदृष्टीने फायदेशीर ठरते. कांद्याच्या पातीमधील अँ‍टी-ऑक्सिडेंट्स तत्व डीएनए आणि सेल्स टिशूंचं होणारं डॅमेज रोखते. तसेच व्हिटॅमिन सी कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगरचं प्रमाण कमी करण्यासही मदत करतं.

हिवाळ्यात पालकाची भाजी खाणं आरोग्यासाठी आणि डोळ्यांसाठी चांगली मानली जाते. पालकाच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, आयर्न, मॅगनीज, झिंक, ओमेगा - 3 फॅटी अ‍ॅसिड आणि फोलेट ही तत्वे असतात.

मुळा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. मुळ्याची भाजी ही ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवते. मुळ्याच्या भाजीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात.

कोबी खाण्याचे अनेक फायदे आहेत. कोबीमध्ये अनेक पोषक घटक आहेत. बद्धकोष्ठता दूर करण्यास कोबी मदत करते.