दिलासादायक! कोरोनाच्या लढाईत भारताला रशियाची साथ; पुढच्या महिन्यात लसीच्या चाचणीला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 12:41 PM2020-09-08T12:41:23+5:302020-09-08T12:50:54+5:30

रशियाच्या कोरोना लसीची चाचणी भारतासह इतर अनेक देशांमध्ये होणार आहे. रशियन डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडाचे सीईओ किरिल दिमित्रीव यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. स्पुटनिक V ही रशीयाची तिच लस आहे. ज्या लसीवर जागतिक आरोग्य संघटनेनं संशय व्यक्त केला होता.

रशियन न्यूज नेटवर्कच्या एका मुलाखतीदरम्यान किरिल यांनी सांगिlले की, अमेरिकेत एक्स्ट्राजेकना ही लस तिसऱ्या टप्प्यात आहे. ३० हजार लोकांवर परिक्षण केलं जाणार आहे. त्याआधीच २६ ऑगस्टला या लसीच्यी रशियामधील रजिस्ट्रेशन स्टडीज अंतर्गत ४० हजार लोकांवर चाचणी करण्यात आली होती. पुढच्या महिन्यात भारत, सौदी अरेबिया, फिलिपींस , ब्राजील आणि भारतात या लसीच्या चाचणीला सुरूवात होणार आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये प्रकाशित केला जाणार आहे. RDIF च्या सीईओंनी दिलेल्या माहितीनुसार लसीच्या सुरक्षितेचा अहवााल भारतातही दिला जाणार आहे.

वैदयकिय नियतकालिक लँसेंटमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार Sputnik-V च्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील रिपोर्ट प्रकाशित झाल्यानंतर भारताने मॉस्कोच्या गमलेया रिसर्च इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमायोलॉजी एंड मायक्रोबायोलॉजीकडून तपशील मागवले आहेत.

भारत आणि रशिया लसीचा विकास आणि उत्पादनासाठी योजनाबद्धरित्या आखणी करत आहेत. भारतील रशियाचे राजदूत निकोले कुदाशेव यांनीही या गोष्टींला पाठिंबा दर्शवत मोठ्या प्रमाणात लसीच्या उत्पादनासाठी परदेशातही मोठी पाऊलं उचलली जात असल्याचे असं सांगितले आहे. यात लसीचे वितरण, विकास आणि उत्पादनाबाबत अधिक माहिती घेतली जाणार आहे.

मागिल महिन्यात रशियाच्या राजदूतांनी भारताच्या आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली होती. या मुलाखतीत डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीचे सेक्रेटरी रेणु स्वरुप आणि पंतप्रधानांच्या सल्लागाराचा सुद्धा समावेश होता.

याचवेळी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कोविड१९ ची लस तयार करण्यासाठी सरकार आणि तज्ज्ञांना प्रोत्साहन दिले. RDIF के सीईओ यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीच्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. ही लस सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

या लसीचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अन्य देशांमध्ये 'इमेरजेंसी यूज रजिस्ट्रेशन सुरू करण्याचा विचार सुरू आहे.