नव्या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांचा दावा, लवकर मृत्यु टाळायचा असेल तर रोज चाला इतकी पावलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 02:25 PM2023-11-04T14:25:48+5:302023-11-04T16:15:42+5:30

Walking Benefits : अनेकांना हे माहीत नसतं की, किती पायी चालावं. तेच आज आम्ही एका रिपोर्टच्या माध्यमातून सांगणार आहोत

Walking Benefits : पायी चालणं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांना माहीत आहे. आता हिवाळा आहे या दिवसात तब्येत चांगली करण्यासाठी लोक पौष्टिक आहार घेतात आणि एक्सरसाइज करतात. अशात पायी चालणं ही एक मुख्य एक्सरसाइज आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, किती पायी चालावं. तेच आज आम्ही एका रिपोर्टच्या माध्यमातून सांगणार आहोत.

एका नव्या रिपोर्टमध्ये असं आढळलं की, 8,800 पावलं पायी चालल्याने तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळू शकते. इतकंच नाही तर यामुळे हृदयरोगाने मृत्यूचा धोकाही कमी होऊ शकतो.

पायी चालण्याचे फायदे - पायी चालणं वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतं. सामान्यपणे असं मानलं जातं की, रोज 10 हजार पावलं चालल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण आता नव्याने समोर आलेल्या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी सांगितलं की, तुम्ही रोज केवळ 8 हजार पावलं चालल्यावर लवकर मृत्युचा धोका टाळू शकता.

काय सांगतो रिसर्च? - ग्रेनाडा यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांद्वारे पहिल्यांदाच असा रिसर्च करण्यात आला की, रोज किती पावलं चालल्याने वजन कमी होऊ शकतं.

वेगाने चालण्याचे फायदे - अभ्यासकांना चालण्याचा वेग आणि त्यानंतर आरोग्याला होणारे फायदे यांच्यात एक संबंध आढळला. यातून असा निष्कर्ष निघाला की, हळू चालण्याऐवजी वेगाने चालण्याचे अनेक फायदे होतात.

मृत्युचा धोका होतो कमी - अभ्यासकांनी सांगितलं की, वेगाने चालल्याने हृदयारोगाने मृत्युचा धोका कमी होतो. 7 हजार ते 8 हजार पावलं चालणं एका दिवसात जवळपास 6.4 किमी चालण्याच्या बरोबर आहे.

जेवढं चालाल तेवढा फायदा - अभ्यासकांनी सांगितलं की, तुम्ही जेवढे जास्त पावलं चालाल, तेवढं फायद्याचं ठरेल. तशी पावलांची ही संख्या फार जास्त नाही. जी आरोग्यासाठी नुकसानकारक असेल. तसे रोज 9 हजार पावलं चालणं कुणासाठीही फायदेशीर ठरतं.

हृदयरोगाचा धोका होईल कमी - अभ्यासकांनी सांगितलं की, रोज 2 हजार 600 पावलं चालल्याने मृत्यु दराचा धोका कमी केला जाऊ शकतो. तर 2 हजार 800 पावलं हृदयासंबंधी समस्यांसाठी फायदेशीर आहे.