हिना खानच्या फिटनेसचं गुपित समजलं; तुम्हीही फॉलो करू शकता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 18:13 IST2019-06-21T18:06:55+5:302019-06-21T18:13:59+5:30

टेलिव्हिजन विश्वातील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आणि लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हिना खान सोशल मीडियावर आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. हिनाचे अनेक चाहते तिच्या स्टाइल, फॅशनसेन्स आणि लूकसोबतच तिच्या फिटनेसचेही फॅन्स आहेत. हिना आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नेहमीच जिममध्ये वर्कआउट करतानाचे फोटो शेअर करत असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नक्की आपली फिटनेस मेन्टेन करण्यासाठी हिना काय डाएट फॉलो करते.
प्रत्येक दिवशी 10 ते 12 ग्लास पाणी
हिना खान सांगते की, आपण जे काही खातो तेच आपल्या स्किनवर दिसतं. त्यामुळे आपण काय खातो, याबाबत आपल्याला सतर्क राहण्याची गरज असते. हिना सांगते की, ती दररोज 10 ते 12 ग्लास पाणी पिते, त्यामुळे डायझेस्टिव्ह सिस्टम क्लिन होण्यास मदत होते. त्यामुळे तुमची स्किन सुंदर दिसते.
नारळाचे पाणी आणि दह्याचे सेवन
फक्त पाणीच नाही तर नारळाचे पाणीही हिनाला फार आवडतं आणि अत्यंत फायदेशीर असल्यामुळे दिवसातून 2 वेळा हिना नारळाचं पाणी पिते. याव्यतिरिक्त एक वाटी दहीदेखील हिनाच्या डेली डाएटचा अविभआज्य घटक आहे.
दररोज एक आवळा खाते हिना
शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्यावरील ग्लो वाढविण्यासाठी हिना खान प्रत्येक दिवशी एक आवळा खाते.
ओव्हरइटिंगपासून दूर राहते हिना
हिना सांगते की, ती फार डाएटिंग करत नाही. तसेच ती शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचा आहार घेते. परंतु ती खाताना फार संयम बाळगते. असं केल्यामुळे ती ओव्हरइटिंगपासून दूर राहते. बॅलेस्ड डाएट घेत असल्यामुळे हिनाचं शरीर हेल्दी राहतं. ज्याचा परिणाम त्यांच्या ग्लोइंग फेसवर दिसून येतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.