निरोगी व्हजायनासाठी सुपर फूड्स ठरतात 'हे' पदार्थ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 04:08 PM2019-05-03T16:08:21+5:302019-05-03T16:38:22+5:30

आपण आपल्या आहारात ज्या पदार्थांचा समावेश करतो. ते सर्व पदार्थ आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम करत असतात. हिच गोष्ट आपल्या प्रायव्हेट पार्ट्सलाही लागू होते. यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) महिलांमध्ये दिसून येणारी एक मोठी समस्या आहे. याकडे दुर्लक्ष करणं अनेकदा घातक ठरू शकतं त्यामुळे आहारामध्ये वेळीच बदल करणं गरजेचं असतं. असे अनेक पदार्थ आहेत जे व्हजायनाचं म्हणजेच महिलांच्या गुप्तांगाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया काही हेल्दी पदार्थांबाबत...

यॉगर्टमध्ये प्रोबायोटिक्स असतात. जे यूटीआय, यीस्ट इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल व्हजायनोसिसपासून बचाव करतात. यॉगर्टमध्ये अस्तित्वात असलेलं कॅल्शिअम पीएमएसचा त्रास कमी करतं.

शरीर आतून स्वच्छ ठेवण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिणं अत्यंत गरजेचं असतं. व्हजायना हेल्दी ठेवण्यासाठी उत्तम उपाय आहे. त्यामुळे स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवा. यामुळे तुमचं व्हजायनल एरिया लूब्रिकेटेड राहण्यास मदत होईल.

दररोज सफरचंद खाल्याने महिलांचं लैंगिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. एका संशोधनातून याबाबत खुलासा करण्यात आला असून या फायद्यांमध्ये सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन, उत्तेजना यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.

एका संशोधनानुसार, ज्या महिला दररोज दोन किंवा त्यापेक्षा जास्तवेळा फळं खात असतील तर त्यामध्ये यूटेराइन फायब्रॉइड असण्याची शक्यता 11 टक्क्यांनी कमी होते.

ग्रीन टीमध्ये पॉलिफिनॉलिक कॅचीन्स असतं. जे E.coli बॅक्टेरिया मारण्यासाठी मदत करतं. हे बॅक्टेरिया यूटीआयसाठी जबाबदार ठरतं. याव्यतिरिक्त ग्रीन टीमध्ये असलेलं कॅफेनमुळे मँस्टुअल सिंड्रोमच्या लक्षणांपासून आराम मिळतो.

भाज्या, लेग्यूम्स आणि व्होल ग्रेन फायबर रिच होतात. हे सर्व व्हजायनल हेल्थसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. फायबर आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढविण्यासाठी मदत करतात. व्हजायना हेल्दी ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पोटाचं आरोग्य उत्तम राखावं लागतं. त्यामुळे हेल्दी वजायनासाठी दररोज जवळपास 25 ग्रॅम फायबर घेणं गरजेचं असतं.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोमत्याही गोष्टीचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.