Fifa World Cup 2022 Qatar: कतारमध्ये पत्नी, गर्लफ्रेंडवर निर्बंध; फुटबॉलपट्टूंनी जबरदस्त तोडगा काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 06:51 PM2022-11-21T18:51:38+5:302022-11-21T18:58:37+5:30

कतार हा ३० लाख लोकसंख्येचा देश. या देशात महिलांविषयीचे कायदे एवढे कडक ही तिथे शिक्षाही जबरदस्त असते. यामुळे फुटबॉल वर्ल्डकपमध्ये खेळाडूंनाच नाही तर बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रेक्षकांनाही पत्नी, गर्लफ्रेंडसोबत मौजमजा करता येणार नाहीय.

फिफा वर्ल्ड कप २०२२ यंदा कतारमध्ये खेळविला जात आहे. हा देश श्रीमंत असला तरी या देशात निर्बंध खूप आहेत. खासकरून महिलांविषयी इथे निर्बंध आहेत. यामुळे फिफा आणि अय्याशी हे समीकरण यंदा काही जुळणार नाही, असे दिसत असतानाच फुटबॉलपट्टूंनी कतारच्या नियमांना वळसा घालत जबरदस्त तोडगा काढला आहे.

कतार हा ३० लाख लोकसंख्येचा देश. या देशात महिलांविषयीचे कायदे एवढे कडक ही तिथे शिक्षाही जबरदस्त असते. यामुळे फुटबॉल वर्ल्डकपमध्ये खेळाडूंनाच नाही तर बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रेक्षकांनाही पत्नी, गर्लफ्रेंडसोबत मौजमजा करता येणार नाहीय. यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेवर खूपच निर्बंध आहेत. इथे हॉटेल आणि जागेचीही समस्या आहे. या साऱ्या समस्यांवर इंग्लंडच्या खेळाडूंनी खतरनाक तोडगा काढला आहे.

इंग्लंडचे फॅन्स खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड, मित्र मैत्रिणी एका अवाढव्य आणि हायफाय क्रूझ शिपवर राहणार आहेत. इथे पाण्यात ना कतारचे निर्बंध ना नियम. या क्रूझवर बार, रेस्टॉरंट सारख्या फाईव्ह स्टार सुविधा आहेत.

ज्या क्रूझवर हे सर्व थांबले आहेत, त्याचे नाव MSC World Europa आहे. ही क्रूझ जगातील सर्वात मोठ्या क्रूझ शिपपैकी एक आहे. या क्रूझमध्ये ३३ बार आणि कॅफे, १४ पूल, 13 डायनिंग व्हेन्यू, ६ स्विमिंग पूल आहेत. यामुळे या क्रूझवर काय मौजमजा असेल याचा विचारही करता येणार नाही.

ही क्रूझ संपूर्ण विश्वचषकादरम्यान दोहामधील समुद्रकिनाऱ्यावर उभी राहणार आहे. या क्रूझवर सुमारे 7000 लोकांची राहण्याची सोय आहे. क्रूझमध्ये 2500 हून अधिक केबिन आहेत, जे 21 मॉल एवढ्या आकारात पसरलेल्या आहेत. इथल्या रेस्टॉरंटमध्ये जगभरातील कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.

कतारमध्ये महिलांना तोकडे कपडे घालण्यास, सर्वांना उघड्यावर दारू पिण्यास बंदी आहे. अशा स्थितीत खेळाडूंच्या पत्नी आणि मैत्रिणींसाठी इंग्लंड फुटबॉल क्लबने यापूर्वीच कोणीही तोकडे कपडे घालू नयेत, असा सल्ला दिला होता. यावर हा भन्नाट तोडगा काढण्यात आला आहे. यामुळे खेळाडूंच्या पत्नी, मैत्रिणी आणि इंग्लंडचे फॅन्सदेखील मौज करू शकणार आहेत.

इंग्लंडला ब गटात वेल्स, अमेरिका आणि इऱाण यांचा सामना करायचा आहे. २१ नोव्हेंबरला त्यांचा पहिला मुकाबला इराणसोबत आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबर ( वि. अमेरिका) व ३० नोव्हेंबर ( वि. वेल्स) अशी लढत होणार आहे.