old memories: प्रार्थना बेहरेच्या लग्नाचा अल्बम कधी पाहिलाय का? बॉलिवूड स्टारप्रमाणेच दिसतो तिचा नवरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 12:56 IST2022-02-07T12:49:22+5:302022-02-07T12:56:07+5:30

Prarthana behere:गोव्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडल्याचं म्हटलं जातं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. आपल्या अभिनयासह सौंदर्याच्या जोरावर प्रार्थनाने असंख्य तरुणांच्या मनावर राज्य केलं.

'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', 'वॉट्सॲप लग्न' या आणि अशा असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेली प्रार्थना सध्या एका मालिकेत काम करत आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून प्रार्थना दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेमुळे तिच्या लोकप्रियतेत कमालीची भर पडली आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या प्रार्थनाविषयी दररोज असंख्य गोष्टी चर्चिल्या जात असतात. यामध्येच सध्या तिच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

प्रार्थनाने अरेंज मॅरेंज केलं असून १४ नोव्हेंबर २०१७ मध्ये तिने मोठ्या थाटात अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली.

गोव्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडल्याचं म्हटलं जातं.

अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक आणि निर्मातादेखील आहे.

मराठमोळ्या पद्धतीने प्रार्थना- अभिषेकचा विवाहसोहळा रंगला.

जवळचा मित्रपरिवार आणि कुटुंबीय यांच्या साक्षीने प्रार्थना-अभिषेकने साताजन्माची गाठ बांधली.

या लग्नात प्रार्थनाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर निळ्या रंगाचा शेला घेतला होता. तर, अभिषेकने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता परिधान केला होता.