बिनधास्त तापसीचे हटके आउटफिट्स; तुम्हीही करू शकता फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:06 PM2019-07-26T12:06:09+5:302019-07-26T13:58:44+5:30

अभिनेत्री तापसी पन्नू आपला आगामी चित्रपट 'सांड की आंख'मुळे फार चर्चेत आहे. या चित्रपटात तापसी पन्नूसोबत भूमि पेडनेकर दिसणार आहे. या चित्रपटात दोघीही शूट आजीबाईंची भूमिका साकारणार आहे. पण आज आपण तापसीच्या चित्रपट नाहीतर तापसीच्या स्टाइलबाबत बोलणार आहोत. तापसी नेहमी आपल्या क्लासी अंदाजासाठी ओळखली जाते.

तापसीच्या इंडो वेस्टर्न लूकबाबत बोलायचे झाले तर तिची ड्रेसिंग स्टाइल कोणापेक्षाही कमी नाही. तापसीने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा तयार केली आहे. आपल्या इंडो-वेस्टर्न लूकने वेगवेगळे स्टाइल स्टेटमेंट देणारी तापसी नेहमीच मुलींना आपल्या स्टाइल स्टेटमेंटने इन्स्पायर्ड करत असते.

इंडो वेस्टर्न ड्रेस म्हणजे, ज्यामध्ये ट्रेडिशनल आणि वेस्टर्नचं फ्यूजन करण्यात येतं. खास करून ज्यांना ट्रेडिशनल लूक करायचा आहे, पण टिपिकल देसी स्टाइलमध्ये नाही. तर त्यांच्यासाठी इंडो वेस्टर्न लूक बेस्ट ठरतो.

इंडो वेस्टर्न ड्रेसेस कोणत्याही फंक्शनसाठी बेस्ट ऑप्शन ठरतात. जे गर्लिश लूकसाठी फायदेशीर ठरतात. जर तुम्हीही इंडो-वेस्टर्न परिधान करण्याचे शौकिन असाल तर, तापसीकडून टिप्स घेऊ शकता.

आपल्या बिनधास्त आणि क्लासी अभिनयाप्रमाणेच तापसी आउटफिट्सही कॅरी करताना दिसून येते.

पॅन्ट्स विथ फ्रंट कट कुर्ती

धोती पॅन्ट्स विथ क्रॉप टॉप आणि लॉन्ग जॅकेट

स्ट्राइप्ड प्रिंटेड साडीसोबत शर्ट स्टाइल ब्लाउज आणि टाय

स्कर्ट स्टाइल धोतीसोबत क्रॉप टॉप

जीन्ससोबत फ्रंट कट कुर्ती

रफ्फल स्टाइल अनारकली ड्रेससोबत ओवरसाइज जॅकेट