Cannes 2019च्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा पांढरा साज आणि क्लासी अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 16:22 IST2019-05-20T16:05:22+5:302019-05-20T16:22:32+5:30

Cannes 2019च्या रेड कार्पेटवर उतरलेल्या बॉलिवूड अभिनेत्रींनी आपला हटके लूक आणि आउटफिट्सनी सर्वांना घायळ केलं. कंगना राणौत, दीपिका पादुकोण, प्रियांका चोपडा, डायना पेंटी, हुमा कुरैशी नंतर आता ऐश्वर्या राय बच्चननेही रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. परंतु यावर्षीच्या फंक्शनमध्ये एक गोष्ट सर्व अभिनेत्रींमध्ये कॉमन दिसून आली ती म्हणजे, व्हाइट कलरचे आउटफिट्स. या सर्व अभिनेत्रींनी रेड कार्पेटपासून कान्सच्या कोणत्या ना कोणत्या इव्हेंटमध्ये व्हाइट रंगाचा ड्रेस नक्की वेअर केला होता.
व्हाइट कलरच्या फेयरीटेल गाउनमध्ये प्रियांका
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने Cannes 2019मध्ये रेड कार्पेटवर आपला डेब्यू केला. यादरम्यान आपल्या दुसऱ्या रेड कार्पेट लूकसाठी प्रियांकाने व्हाइट कलरच्या सुंदर फेयरीटेल गाउनची निवड केली होती. तसं पाहायला गेलं तर कदाचित व्हाइट प्रियांकाचा फेवरेट कलर असावा. कारण अनेकदा ती व्हाइट रंगाच्या आउटफिट्समध्ये दिसून येते.
प्रियांका चोपडा आहे व्हाइट लव्हर
रेड कार्पेटव्यतिरिक्त कान्सच्या वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये प्रियांका व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये दिसून आली. पार्टीसाठीही तिने व्हाइट कलरचा ऑफ-शोल्डर कॉर्सेट स्टाइल पॅन्ट सूट वेअर केला होता. तसेच कान्समध्ये एन्ट्री करताना प्रियांकाने ऑफ व्हाइट कलरच्या सॅटिन ब्लेजर आणि मॅचिंग कलरच्या फॉर्मल पॅन्ट वेअर केली होती.
व्हाइट कलरच्या गाउनमध्ये गॉर्जिअस दिसत होती कंगना
बॉलिवूडची क्विन कंगनाही स्वतःला व्हाइटपासून दूर ठेवू शकली नाही. कंगनाही कान्सच्या वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये व्हाइट आउटफिट्समध्ये दिसून आली. कान्स 2019च्या एका इव्हेंटमध्ये कंगना सिंगल स्लिव्स असणाऱ्या शॉर्ट ट्रेल आणि साइड स्लिट असणाऱ्या अत्यंत सुंदर गाउनमध्ये दिसून आली. कंगनाने आपला हा लूक पॉइंटेड टो हिल्स आणि एमरेल्ड ग्रीन ईअररिंग्ससोबत टिमअप केलं होतं. त्यानंतर डे-आउट दरम्यानही कंगना व्हाइट कलरच्या को-ऑर्ड सेटमध्ये दिसून आली. ऑफ-शोल्डर क्रॉप टॉप आणि ए-सिमिट्रिकल शॉर्ट स्कर्टमध्ये कंगना फार कॅज्युअल परंतु कूल दिसत होती.
व्हाइट गाउनमधये दीपिकाचा फर्स्ट रेड कार्पेट लूक
प्रियांका आणि कंगना व्यतिरिक्त दीपिका पादुकोणही कान्समद्ये व्हाइट कलर कॉन्फिडन्टली कॅरी करताना दिसून आली. दीपिकाने इव्हेंटच्या पहिल्या रेड कार्पेट लूकसाठी व्हाइट कलरच्या प्लंजिंग नेकलाइन गाउन निवडला होता. ज्याचा ट्रेल फार लांब असून ड्रेसचा हायलाइट होता. यामध्ये असलेला ब्लॅक कलरचा मोठा बो सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.
व्हाइट कलरच्या ट्रान्सपरंट टॉपमध्ये दीपिका
कान्सच्या आणखी एका इव्हेंटमध्ये दीपिका दिसून आली व्हाइट कलरच्या स्ट्राइप असणाऱ्या फॅन्ट आणि व्हाइट कलरच्य ट्रान्सपरंट टॉपमध्ये. जो तिने व्हाइट कलरच्या लेस असणाऱ्या ब्रासोबत टिमअप करून वेअर केला होता. या बोल्ड लूकमध्ये ती फार सुंदर दिसत होती.
डायनाने निवडली ऑफ व्हाइट कलरची सिल्कची साडी
प्रियांका, दीपिका आणि कंगनाव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटीही कान्सच्या रेड कार्पेटवर दिसून आली. दुसऱ्या दिवशीच्या लूकसाठी डायनाने ऑफ व्हाइट कलरची सिल्क साडी वेअर केली होती. डायनाने ही सिल्कची साडी बेल्टेड स्टाइलमध्ये साडी गाउनप्रमाणे वेअर केली होती. डायना या लूकमध्ये फार सुंदर दिसत होती.