धक्कादायक! पतीसमोरच पत्नीवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींना अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 02:38 PM2021-07-09T14:38:55+5:302021-07-09T14:52:15+5:30

crime news : नराधमांनी आपल्या मोबाइलवरून या भयंकर घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला.

महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असताना बिहार येथून सर्वांना हादरून टाकणारी एक माहिती समोर आली आहे.

गेल्या आठवड्यापूर्वी बिहारच्या छपरा जिल्ह्यात काही नराधमांनी एका महिलेवर तिच्या पतीसमोर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. इतकेच नाही तर या नराधमांनी आपल्या मोबाइलवरून या भयंकर घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला.

सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या व्हायरल होत असताना हा व्हिडिओ सारण पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक संतोष कुमार यांच्यापर्यंतही पोहोचला.

या व्हिडिओची त्वरित दखल घेत पोलीस अधीक्षकांनी आमनौर पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना याची तपासणी करून व्हिडिओमध्ये दिसणार्‍या आरोपींची ओळख पटविण्यासाठी व त्यांना अटक करण्याचे निर्देश दिले.

या बलात्काराच्या घटनेचा व्हिडिओ एक आठवड्याच्या आसपास सांगितला जात आहे. गोसी अम्नौर ते परशुरामपूरकडे जाणाऱ्या आरईओ मार्गादरम्यानच्या मोठ्या कालव्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी आरोपींनी ही घटना घडवून आणली आहे.

व्हिडिओवरून असे दिसते की, ती महिला आपल्या पतीसह कुठेतरी जात होती. यावेळी या दोघांना कालव्याजवळ नराधमांनी पकडले व घाबरवून तिला जवळच्या झाडींमध्ये नेले आणि या महिलेच्या नवऱ्यासमोर अपमानास्पद कृत्य केले. तसेच, त्या महिलेचा व्हिडिओ बनविण्यात आला.

दरम्यान, या व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केल्यानंतरही अद्याप पीडित महिला किंवा तिचा नवरा दोघेही पोलिसांसमोर आले नाहीत.

त्यामुळे, असे वाटते की काही भीतीमुळे किंवा सामाजिक अपमानामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार केली नसेल.

पोलिस अधीक्षक संतोष कुमार म्हणाले की, पीडित महिलेचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर या सर्व अटक आरोपींविरूद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत, त्या आधारावर या सर्व आरोपींना कायदेशीररीत्या वेगाने शिक्षा देण्याची प्रक्रिया न्यायालयात सुरू केली जाईल.