दुसरं लग्न केलेल्या वडिलांचे बिंग असं फुटलं, आईचे पुरलेले प्रेत मुलाने काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 07:56 PM2020-06-12T19:56:47+5:302020-06-12T20:04:36+5:30

पहिल्या पत्नीची हत्या केल्यानंतर दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीसह पाच वर्षांपासून पळून जाऊन पोलिसांना चकवत होता.पाच वर्षांनंतर गोरखपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आरोपी आपले नाव व पत्ता बदलून गेली पाच वर्षे पोलिसांना चकवा देत होता. दुसर्‍या महिलेबरोबर आयुष्य घालवण्यासाठी त्याने पहिल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याची माहिती देणाऱ्यास १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

गोरखपूरच्या कैंट भागातील गृह विकास कॉलनी कुडाघाट येथे राहणारा सिद्दीक अली याने लष्करातून व्हीआरएस घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्याने तिचे अंत्यसंस्कार केले.

आरोपीने आईच्या मृत्यूची माहिती सीआरपीएफमधील कमांडो मुलगा तालिब अली याला दिली नाही. जेव्हा तो रजेवर घरी परत आला तेव्हा त्याला त्याच्या आईच्या मृत्यूबाबत माहिती मिळाली. दरम्यान, वडिलांचा दुसर्‍या महिलेशी अनैतिक संबंध असल्याने वडिलांनी आईची हत्या केल्याचा त्याला संशय आला.

सीओ सुमितकुमार शुक्ला यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणात मृताचा मुलगा तालिब अली याने पोलिसात विष देऊन आईची हत्या केल्याबद्दल वडिलांविरूद्ध एफआयआर दाखल केला होता.

पोलिसांनी वडील सिद्दीक अलीविरोधात भा. दं. वि. कलम 302, 328 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. मुलाच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्याच्या आईचा मृतदेह पुरलेल्या थडग्यातून बाहेर काढला आणि त्याचे शवविच्छेदन केले.

दरम्यान, पोलिसांनी सिद्दीकविरोधात 15 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पोलिसांना चकवण्यासाठी त्याने आपले नाव आणि पत्ता बदलला आणि इकडे-तिकडे काम करत राहिले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला पण तो कुठेही सापडला नव्हता.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात शरीरावर आघात (एंटीमार्टम ट्रामा) केल्याचे आढळले. याबाबत एफआयआरमध्ये माहिती समाविष्ट करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.

दरम्यान, पोलिसांना त्याच्याविरोधात सुगावा लागला, म्हणून पोलिसांनी ११ जून रोजी खुनाचा आरोपी सिद्दीक याला अटक केली. मात्र, या प्रकरणातील आरोपी सिद्दीक अली म्हणतो की, त्याची मुलगी आणि मुलापासून त्याच्या जीवाला धोका आहे. त्याच्यावर चाकू व काठीने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी त्यांनी कैंट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखलही केला पण तो खटला मी हरलो.

आरोपीने पुढे सांगितले की, ५० नातेवाईक त्याच्या पत्नीच्या अंत्यसंस्काराच्यावेळी हजर होते. त्यावेळी त्यांची मुलगी आणि मुलगा देखील उपस्थित होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून तुरूंगात पाठविले आहे. त्याचबरोबर हे न्यायालय निर्णय घेईल की त्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे की नाही.