मुंबईत झालं एकतर्फी प्रेम, नंतर जयपूरमध्ये माथेफिरू प्रियकराने घडवली 'डर' सिनेमाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 01:03 PM2021-06-24T13:03:30+5:302021-06-24T13:27:51+5:30

४१ वर्षीय आदित्य जैनवर गोळी झाडण्याचा आरोपाखाली ४२ वर्षीय कमलेश शिंदेला मुंबईहून अटक करून राजस्थान पोलीस जयपूरला नेत आहे.

जयपूरच्या गांधी पथ येथे एका कार स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीवर गोळीबार झाल्याच्या प्रकरणाची केस सॉल्व्ह झाली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

४१ वर्षीय आदित्य जैनवर गोळी झाडण्याचा आरोपाखाली ४२ वर्षीय कमलेश शिंदेला मुंबईहून अटक करून राजस्थान पोलीस जयपूरला नेत आहे.

लोकांच्या गाड्या स्वच्छ करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या एका मजुराला मुंबईतील बिल्डरने भाड्याचे शूटर हायर करून गोळ्या झाडून संपवण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याची कहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभावी अशीच आहे. पण सत्य घटना आहे.

गोळ्या लागल्याने जखमी झालेला आदित्य जैन आणि बिल्डर कमलेश शिंदे पाच वर्षांआधी मुंबईतील बोडीवालीमध्येमध्ये राहत होते.

तेव्हा आदित्य जैनचं दुकान होतं आणि कमलेश शिंदे तेव्हा कन्स्ट्रक्शन मजूर होता. कमलेश आदित्यच्या दुकानावर येत-जात होता आणि तिथे कमलेश आदित्यच्या पत्नीच्या एकतर्फी प्रेमात पडला.

हळूहळू कमलेशकडे पैसे येत गेले आणि तो बिल्डर बनला. त्यानंतर तो आदित्यच्या पत्नीकडे जाऊन जबरदस्ती करू लागला होता. आपली आब्रू वाचवण्यासाठी आदित्य जैनच्या परिवाराने आपलं दुकान विकलं आणि ते जयपूरला शिफ्ट झाले.

तिथे आदित्य लोकांच्या गाड्या स्वच्छ करण्याचं काम करू लागला. तर पत्नीने मेस सुरू केली होती. मात्र, कमलेश शिंदेने त्यांचा पिच्छा सोडला नाही. तो त्यांच्यामागे जयपूरला पोहोचला. त्यानंतर त्याने आदित्यला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

जेव्हा आदित्यने कमलेशचं काहीच ऐकलं नाही तेव्हा कमलेशने भाड्याने शूटर हायर केले आणि गाडी स्वच्छ करत असलेल्या आदित्यवर त्याने गुंडांकडून गोळीबार करून घेतला. पहिली गोळी हातावर लागली तर आदित्य जीव वाचवून पळाला आणि एका दुकानातून जाऊन लपला.

त्यानंतर गुंडांनी आणखी तीन गोळ्या त्याच्यावर झाडल्या. पण तो वाचला. सध्या त्याच्यावर जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आरोपी कलमेश शिंदेला घेऊन पोलीस पोहोचत आहेत.

आदित्य जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याने पोलिसांना सगळी कहाणी सांगितली की, कशाप्रकारे कमलेश त्याच्या पत्नीमागे लागला.

पती आणि पत्नी सतत भीतीच्या वातावरण जगत आहेत. ते घाबरून जयपूरच्या बाहेरील भागात येऊन राहत होते. मात्र, कमलेशने त्यांना शोधून काढलं.