बापरे! आईनं चिकन शिजवण्यासाठी ठेवलं होतं पाणी, पण १० मिनिटांत त्यात दिसली मुलगी...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 07:14 PM2021-08-16T19:14:54+5:302021-08-16T19:46:18+5:30

Toddler found burnt in boiling water : आई वडिलांचं थोडंसं दुर्लक्ष मुलांचं खूप नुकसान करू शकतं. अशीच एक दुर्दैवी घटना यूक्रेनमध्ये घडली आहे. या घटनेत दोन वर्षाची मुलगी उकळत्या पाण्यात पडली. यात ती गंभीर जखमी झाली आणि नंतर तिचा मृत्यूही झाला.

पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आईचे नाव डॅरिना तर वडिलांचं नाव इवान आहे. मुलगी लेस्याच्या मृत्यूनंतर पोलीस या दोघांचीही चौकशी करत आहेत.

ही घटना यूक्रेनच्या ग्रायगोरीवका (Grygorivka) गावात घडली आहे. पोलीस चौकशीत मुलीच्या आईने सांगितले की, चिकन शिजवण्यासाठी त्यांनी किचनमध्ये गॅसवर एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं.

नंतर काहीतरी कामासाठी ती किचनच्या बाहेर आली. दहा मिनिटांनंतर ती जेव्हा किचनमध्ये पुन्हा गेली तेव्हातिची मुलगी लेस्या उकळत्या पाण्यात पडली होती आणि पोळून निघाली होती.

पोलीस तपासात असं समोर आलं की, या घटनेनंतर आई-वडिलांनी या मुलीला रुग्णालयात नेलं नाही तर एका साध्या डॉक्टरकडे घेऊन गेले.

मात्र, प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, लेस्या तब्बल दहा दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती, मात्र डॉक्टर तिचा जीव वाचवू शकले नाहीत.

कोर्टात सुनावणीदरम्यान या मुलीचे आई वडील दोषी गुन्हेगार असल्याचं सिद्ध झाल्यास त्यांना ७ ते १५ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.