'पंछी बनु उडती फिरु...' मुन्नीची नवी पोस्ट, सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 05:15 PM2024-04-30T17:15:25+5:302024-04-30T17:23:54+5:30

बजरंगी भाईजान' फेम हर्षाली मल्होत्रा चर्चेत आली आहे.

अभिनेता सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली.

या चित्रपटात मुन्नी ही भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्राने केलेल्या अभिनयाचं सर्वांनीच तोंडभरू कौतूक केलं.हा चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता.

उत्तम पटकथा आणि अप्रतिम अभिनयाने सिनेमा सुपरहिट ठरला होता.अशातच हर्षालीचे काही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता मुन्नीला ओळखणंही कठीण झालं आहे.

या चित्रपटामुळे हर्षालीच्या फॅन फोलोइंगमध्येही जबरदस्त वाढ झाली. अभिनेता सलमानसह करिना कपूर तसेच नवाजुद्दीन सिद्धीकी यांसारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळाली.

हर्षाली सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव्ह असते. ती उत्तम डान्सरही आहे. लवकरच हर्षली पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसेल अशी शक्यता आहे.

दरम्यान, इन्स्टाग्रामवर हर्षालीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात तिने आकाशी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. केसात गुलाब, कानात झुमके घालत तिने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवलाय.

हर्षालीच्या या फोटोंवर जवळपास २ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.