पृथ्वी शॉ याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता? मुंबई न्यायालयाने फलंदाजाला पाठवले समन्स

मुंबई सत्र न्यायालयाने क्रिकेटपटू पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw ) याला समन्स बजावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 04:37 PM2024-04-30T16:37:56+5:302024-04-30T16:38:26+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai court issues summons to Delhi Capitals' Prithvi Shaw following allegations of molestation by social media influencer | पृथ्वी शॉ याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता? मुंबई न्यायालयाने फलंदाजाला पाठवले समन्स

पृथ्वी शॉ याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता? मुंबई न्यायालयाने फलंदाजाला पाठवले समन्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई सत्र न्यायालयाने क्रिकेटपटू पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw ) याला समन्स बजावले आहे. सोशल मीडिया इन्फ्युअन्सर सपना गिलने ( Sapna Gill)  क्रिकेटपटूविरुद्ध केलेल्या तक्रारीबाबत न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेला उत्तर म्हणून समन्स बजावले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, अंधेरीतील मेट्रोपॉलिटन कोर्टाने सपनाच्या एका पबमध्ये तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पृथ्वी शॉ याच्याविरुद्ध FIR दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या पोलिस चौकशीचे आदेश दिले होते.


पण, शॉ आणि त्याच्या मित्राविरुद्ध तिच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदविण्यात अपयशी ठरल्याबद्दल पोलिसांवर कारवाई करण्याची सपनाची विनंती करणारी दुसरी याचिका न्यायालयाने फेटाळली होती. दोन्ही आदेशांवर असमाधानी झालेल्या सपनाने मालाड येथील सत्र न्यायालयासमोर पुनर्विलोकन अर्ज दाखल केला आणि असा दावा केला की महानगर दंडाधिकारी यांनी ३ एप्रिल रोजी दिलेला आदेश "अनियमित आणि बेकायदेशीर" होता व न्यायालयाने तो पास करण्यात "गंभीर चूक" केली होती. अधिवक्ता अली काशिफ खान यांच्यामार्फत पुनर्विचार अर्ज दाखल करण्यात आला होता.


मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीजी ढोबळे यांनी पृथ्वी शॉ आणि विमानतळ पोलिसांना समन्स बजावले, ज्यांनी सपना यांनी प्रथम तक्रार दाखल करूनही गुन्हा दाखल केला नव्हता. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ जून रोजी होणार आहे.


मुंबईत एका हॉटेलमध्ये सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादानंतर पृथ्वी शॉवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सपनाला फेब्रुवारी २०२३ मध्ये इतरांसह अटक करण्यात आली होती. ती सध्या जामिनावर बाहेर आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर तिने अंधेरीतील विमानतळ पोलिस ठाण्यात क्रिकेटपटू व त्याच्या मित्राविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी क्रिकेटपटूविरुद्ध गुन्हा दाखल न केल्याने तिने नंतर दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. 


तक्रारीत सपनाने भारतीय दंड संहिता कलम ३५४ (विनयभंग), ५०९ (महिलेच्या शिष्टाचाराचा अपमान करण्याचा हेतू असलेला शब्द, हावभाव किंवा कृत्य) आणि ३२४ (स्वैच्छिकपणे धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी दुखापत करणे) अंतर्गत FIR नोंदविण्याची मागणी केली. पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांनी तिच्यावर बॅटने हल्ला केल्याचा आरोप आहे. 

Web Title: Mumbai court issues summons to Delhi Capitals' Prithvi Shaw following allegations of molestation by social media influencer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.