फेसबुकवरच्या मैत्रिणीने आधी खरं सोनं देऊन 'पटवलं', नंतर १० लाख रूपयांनी त्याला लावला चूना....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 02:12 PM2021-03-13T14:12:38+5:302021-03-13T15:09:33+5:30

दोघांमध्ये आधी फेसबुकच्या माध्यमातूनच संवाद सुरू राहिला. हे बरेच महिने सुरू होतं. सिंह यांचा प्रियंकावर पूर्ण विश्वास बसला होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीच्या अनेक घटना सतत समोर येत असतात. अशीच एक घटना जोधपूरमध्ये घडली आहे. येथील एका व्यक्तीची सोशल मीडिया मैत्रीणीकडून फसवणुक झाली आहे. त्याच्या १० लाख रूपये लुटले गेले.

जोधपूरच्या संजय कॉलनीमध्ये राहणारे माजी सैनिक खिवसिंह यांची काही दिवसांपूर्वी फेसबुकवर प्रियंका कुमार नावाच्या महिलेसोबत मैत्री झाली होती.

दोघांमध्ये आधी फेसबुकच्या माध्यमातूनच संवाद सुरू राहिला. हे बरेच महिने सुरू होतं. सिंह यांचा प्रियंकावर पूर्ण विश्वास बसला होता.

एक दिवस प्रियंकाने त्यांना सांगितले की, माझे काका वाळूचं काम करतात. त्याना काम करताना एक चमकता धातु सापडला आहे. त्याची माहिती आम्ही काढली तर ते सोनं असल्याचं समजलं.

खिवसिंह तो सोन्याचा तुकडा घेऊन जोधापूरला आले. त्यांनी त्या सोन्याची टेस्ट करून घेतली. तर ते खरं सोनं होतं.

यानंतर खिवसिंह प्रियंकाने सांगितल्यानुसार आसामला पोहोचले आणि तिथे प्रियंका त्यांना घेण्यासाठी आली होती. खिवसिंह बरपेटाहून गुवाहाटी आणि गुवाहाटीवरून त्याच्या गावी गेले. तिथे त्यांना प्रियंकाचे काका भेटले.

प्रियंकाचे हे काका ना बोलू शकत होते ना त्यांना ऐकू येत होतं. त्यांनी सोन्याचा एक तुकडा कापून खिवसिंह यांना दिला.

खिवसिंह तो सोन्याचा तुकडा घेऊन जोधापूरला आले. त्यांनी त्या सोन्याची टेस्ट करून घेतली. तर ते खरं सोनं होतं.

काही दिवसांनी त्यांना प्रियंकाचा फोन आला आणि ती म्हणाली की, २ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे काका २० लाख मागत आहेत. पण तुम्हाला १० लाख देऊ.

यानंतर ११ फेब्रुवारीला खिवसिंह पुन्हा आसामला गेले आणि त्यांनी १० लाख रूपये देऊन त्यांच्याकडून धातु घेतला. आता या धातुची सोनाराकडून टेस्ट केली तर समजलं की, ते सोनं नाही.

यानंतर खिवसिंहने प्रियंकाच्या सर्व नंबर्सवर फोन केला तर तिचे सर्व फोन बंद होते. मग ते प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी फसवणुकीची तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.