INDW vs SAW: दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा! टीम इंडियाचे बिझी शेड्युल, वेळापत्रक जाहीर

बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 07:02 PM2024-05-14T19:02:25+5:302024-05-14T19:02:43+5:30

whatsapp join usJoin us
South Africa Women’s all-format tour of India announced, India will host South Africa from June 13 to July 9 in Bengaluru and Chennai | INDW vs SAW: दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा! टीम इंडियाचे बिझी शेड्युल, वेळापत्रक जाहीर

INDW vs SAW: दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा! टीम इंडियाचे बिझी शेड्युल, वेळापत्रक जाहीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

INDW vs SAW Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ भारत दौऱ्यावर येणार असून, इथे ३ वन डे, १ कसोटी आणि ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिका बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये पार पडतील. १३ जून रोजी एक सराव सामना खेळवला जाईल, तर २८ जून ते १ जुलै या कालावधीत ४ दिवसीय कसोटी सामना होईल. 

१३ जून ते ९ जुलैपर्यंत थरार

  • १३ जून - सराव सामना, SA vs BP XI (बंगळुरू)
  • २८ जून ते १ जुलै - कसोटी सामना (चेन्नई)
  • वन डे मालिका
  1. १६ जून - पहिला सामना 
  2. १९ जून - दुसरा सामना
  3. २३ जून - तिसरा सामना

ट्वेंटी-२० मालिका

  1. ५ जुलै - पहिला सामना 
  2. ७ जुलै - दुसरा सामना
  3. ९ जुलै - तिसरा सामना

Web Title: South Africa Women’s all-format tour of India announced, India will host South Africa from June 13 to July 9 in Bengaluru and Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.