लॉकडाऊन दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली चालवले जात होते सेक्स रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 06:04 PM2020-06-08T18:04:04+5:302020-06-08T18:12:08+5:30

लॉकडाऊन दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझियाबादमधील इंदिरापुरममध्ये हा वेश्या व्यवसाय चालविला जात होता.

एक व्यक्तीने ग्राहक बनून स्पा सेंटरच्या आत प्रवेश केला आणि व्हिडिओ, ऑडिओ मिळविला. नंतर त्याने हा पुरावा पोलिसांच्या स्वाधीन केला. यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत ४ जून रोजी कारवाई केली. याप्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

गाझियाबादमधील जस्टिस ब्लॉक 2 मधील रहिवासी उमाकांत शर्मा यांच्या घराभोवती अनेक तरूण आणि महिला फिरत असत. उमाकांतला त्यांचे काम पाहून संशयास्पद वाटले. जेव्हा त्यांनी तपास सुरू केला तेव्हा हे समजले की खोटा येथील निती खंड, अहिंसा खंड १ आणि खोडा या तीन ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात आहे. त्याने पोलिसांत तक्रार केली, पण काही उपयोग झाला नाही. 

परिचितांशी बोलल्यानंतर असे आढळून आले की, जेव्हा या प्रकरणातील व्हिडिओ असेल तेव्हाच पोलिस कारवाई करतील. यावर त्या व्यक्तीने निती खंड व अहिंसा खांड येथे सुरू असलेल्या स्पा सेंटरचा मोबाईल क्रमांक मिळविला आणि ग्राहक बनून आत प्रवेश मिळवून व्हिडिओ बनविला. त्याने एसएसपीकडे तक्रार केली आणि व्हिडिओ दाखवला. एसएसपीने इंदिरापुरम पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. यानंतर पोलिसांनी ४ जून रोजी कारवाई केली.

3 ठिकाणी स्पा सेंटर कार्यरत होते - असे म्हटले जाते की, नीति खांडमधील वेलकम स्पा सेंटर, जयपुरिया सनराइझ ग्रीन, अहिसा खंडातील क्राउन स्पा शॉप आणि राजीव बिहार खोडा मधील स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविण्यात येत होते. याप्रकरणी पोलिसांनी सचिन उर्फ अमित शर्माविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो फरार आहे.

"तक्रारदाराने दिलेल्या व्हिडिओच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल. स्पा सेंटर बंद करण्यात आले आहे." अशी माहिती इंदिरापुरम पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी संजीव शर्मा यांनी माहिती दिली. 

अशा तक्रारी वैशाली, वसुंधरा आणि कौशांबीमध्ये आढळून आल्या आहेत. लोक म्हणतात की, पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. तक्रारदारांकडून पुरावे मागितले जातात. हे रॅकेट काही पोलिसांच्या संगनमताने चालविला जात असल्याचा आरोप आहे.