पोलीस अधिकाऱ्याच्या गलिच्छ कारनाम्यामुळे हादरलेले दिल्ली पोलीस दल

By पूनम अपराज | Published: October 26, 2020 09:13 PM2020-10-26T21:13:47+5:302020-10-26T21:29:41+5:30

Molestation by Police Officer : एकाच दिवसात द्वारकामध्ये विनयभंग, कारमधील मुलींचा पाठलाग करणे आणि अश्लील भाष्य करणे यासाठी चार एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत.

पोलीस उपनिरीक्षकाच्या कारनाम्याने काही मुली, स्त्रिया भयभीत झाल्या आहेत. या पोलीस उपनिरीक्षकाने आणखी बर्‍याच मुली व महिलांचा विनयभंग केला आहे. परंतु भीतीमुळे एफआयआर नोंदविला गेला नाही. (All Photos - Aaj tak)

विनयभंगाची सवय असलेला हा पोलीस उपनिरीक्षक शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज त्यांनी तपासले. दिल्लीत 286 बालेनो कार आहेत, शोधलेल्या सर्व बलेनो मालकांचा डोझीअर पोलिसांनी बनविला.

करड्या रंगाच्या विना नंबरप्लेट बलेनो कारने पोलिसांचा गणवेश न परिधान करता सकाळी पोलीस उपनिरीक्षक अशा घटना घडवून आणत असत. ऑक्टोबरमध्ये त्याने द्वारका भागात सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत विनयभंगाच्या अनेक घटना घडवून आणल्या.

आरोपीला पकडण्यासाठी एसएचओ, एसीपी यांच्यासह दिल्ली पोलिसांचे सुमारे २०० पोलीस तैनात होते. शेवटी आरोपीला अटक केली गेली, तेव्हा तो दिल्ली पोलीस दलातील उपनिरीक्षक म्हणून बाहेर आला.

या पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध आणखी अनेक गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, त्याच्या गुन्ह्यांची माहिती काढली जात आहे.