Vi रिचार्जवर ६० रूपयांपर्यंतच मिळतोय कॅशबॅक; पाहा कसा घेऊ शकता लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 03:04 PM2021-07-28T15:04:13+5:302021-07-28T15:16:38+5:30

Vodafone-Idea : दूरसंचार कंपन्या सातत्यानं आणतायत ग्राहकांसाठी नवनवे प्लॅन्स. व्होडाफोन आयडिया कंपनीनं आणलीये ग्राहकांसाठी विशेष सुविधा.

रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल, व्होडाफोन आयडिया यांसारख्या टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सातत्यानं रिचार्ज प्लॅन आणत आहेत. तसंच वेळोवेळी कॅशबॅक ऑफरही कंपन्यांकडून आणल्या जात आहेत.

दिग्गज टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडिया ही आपल्या ग्राहकांसाठी एक कॅशबॅक सुविधा देत आहे. या ऑफर अंतर्गत व्होडाफोन आयडिया रिचार्जवर ग्राहकांना ६० रूपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे.

महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना या ऑफरचा लाभ ३१ जुलैपर्यंत घेता येणार आहे. कॅशबॅक कुपन रिचार्जच्या एका आठवड्यानंतर Vi App मध्ये क्रेडिट करण्यात येईल.

कंपनी निरनिराळ्या व्हॅलिटिडी रिचार्ज प्लॅन्ससह निरनिराळे कॅशबॅक देत आहे. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना अनलिमिटेड प्लॅन घ्यावा लागेल.

कंपनीनं वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार २८ दिवसांचा अनलिमिटेड प्लॅन निवडल्यानंतर ग्राहकांना २० रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे.

याशिवाय १९९ रूपये, २१९ रूपये, २४९ रूपये, २९९ रूपये, ३९८ रूपये, ३०१ रूपये, ४०१ रूपये आणि ४०५ रूपयांचे प्लॅन्सदेखील येतात.

जर ग्राहकांनी ५६ दिवसांचा प्लॅन निवडला तर ग्राहकांना ४० रूपयांचा कॅशबॅक देण्यात येतो. तसंच ५६ दिवसांच्या वैधतेसह कंपनी ३९९ रूपये, ४४९ रूपये, ६०१ रूपये, ५९५ रूपये, ५५५ रूपये आणि ५५८ रूपयांचे प्लॅन्स येतात.

८४ दिवस किंवा त्याच्यापेक्षा अधिक वैधतेसह कंपनी ५९९ रूपये, ६९९ रूपये, ७९५ रूपये, ८०१ रूपये, ८१९ रूपये, ११९७ रूपये, २३९९ रूपये, २५९५ रूपयांचे प्लॅन्स येतात.

कंपनीकडून देण्यात येणारा कॅशबॅक हा Vi या अॅपद्वारे रिडिम केला जाऊ शकतो. २० रूपयांचे कुपन एका महिन्यासाठी वैध असते. तर याचा वापर ग्राहकांना २९९ रूपयांच्या किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीच्या प्लॅनसोबत करता येऊ शकतो.

४० रूपयांचं कूपन दोन महिन्यांसाठी वैध असतं. तसंच याचा वापर ४४९ रूपये किंवा त्याच्यापेक्षा अधिक किंमतींच्या पॅकसाठी करता येऊ शकतो.

६० रूपयांच्या कुपनचा वापर तीन महिन्यांपर्यंत वैध असतो. तसंच याचा वापर ६९९ रूपये किंवा त्यापेक्षा अधिकच्या रिचार्जवर केला जाऊ शकतो.