वाहनात सीएनजी भरताना कारच्या बाहेर का उतरतात? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 05:50 PM2023-11-22T17:50:40+5:302023-11-22T18:03:45+5:30

तुम्हीही सीएनजीवर चालणारी वाहन वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहेत.

सध्या सीएनजी या इंधनाचा वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. सीएनजीचा वापर ऑटो रिक्षा, बस आणि कारमध्ये केला जातो. यावर चालणाऱ्या वाहनात बसले की सीएनजी पंपावर गाडीतून बाहेर यावे लागते.

वाहनात कितीही लोक बसले असले तरी सीएनजी भरताना सर्वांनाच खाली उतरावे लागते, सीएनजी भरताना खाली का उतरावे लागते हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.काहींना गाडीतून खाली उतरवल्यावर राग यायला लागतो. अशा स्थितीत ती का खाली केली जाते, असा प्रश्न पडतो. याची अनेक नवीन कारणे आहेत. याचे खरे कारण जाणून घेऊया..

वाहनात सीएनजी रिफिल करताना, सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येकाला गाडीतून उतरायला लावले जाते.

वाहनात बसवलेल्या टाकीच्या आत सीएनजी खूप जास्त दाबाने भरला जातो. टँक रिफिलिंग दरम्यान स्फोट किंवा गळती झाल्यास, लोकांना बचावण्याची संधी मिळाली पाहिजे. यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव गाडीत बसलेल्या लोकांना खाली उतरण्याचा सल्ला दिला जात आहे.

देशात फॅक्टरी फिटेड सीएनजी किट असलेली वाहने कमी आहेत. अशा परिस्थितीत देशातील अनेक लोक बाहेरील मेकॅनिककडून त्यांच्या कारमध्ये सीएनजी किट बसवून घेतात.

ज्या वाहनांमध्ये बाहेरील मेकॅनिककडून सीएनजी किट बसवले जातात. त्या वाहनांमध्ये सीएनजी भरायची पोर्ट कुठे आहे माहीत नाही? या वाहनांमध्ये, सीएनजी फिलिंग नॉब मागील बूटमध्ये असू शकते किंवा मधल्या सीटखाली असू शकते. अशा स्थितीत सीएनजी रिफिलिंगच्या वेळी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून कारमध्ये बसलेल्या सर्वांना गाडीतून उतरण्यास सांगण्यात येते.

सीएनजीच्या वासामुळे अनेकांना त्रास होतो. वाहनांमधील सीएनजी गळतीमुळे अनेकदा डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येते. अशा परिस्थितीत रिफिलिंग स्टेशनवर वाहनातून बाहेर पडणे चांगले असते. यामुळे वाहनातून बाहेर पडतात.

सीएनजी पंपाचे मीटर पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत थोडे वेगळे आहे. अशा परिस्थितीत मीटरवर लक्ष ठेवण्यासाठी वाहनातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला जातो.

सध्या देशभरात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमामात वाढले आहेत. यापूर्वी फक्त देशातील मोठ्या शहरातच सीएनजीवर चालणारी वाहने वापरली जात होती. पण आता देशातील अन्य शहरातही सीएनजी पंप सुरू झाले आहेत. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे.