आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
1 / 6 Thalapathy Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार आणि राजकारणात नव्याने एंट्री करणारे जोसेफ विजय उर्फ थलापती विजय यांच्याकडे तब्बल ₹६२४ कोटींची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या गुंतवणूकीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे.2 / 6 विजय यांचे प्रतिज्ञापत्र पाहता, त्यांची गुंतवणूक अत्यंत सुरक्षित असल्याचे दिसते. त्यांनी शेअर बाजारातील जोखमीऐवजी बँक ठेवी आणि फिक्स्ड डिपॉझिटवर अधिक भर दिला आहे. त्यांनी Indian Overseas बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ₹२१३.३६ कोटी, तर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ₹१०० कोटींपेक्षा अधिक गुंतवले आहेत.3 / 6 याशिवाय, अॅक्सिस बँकेत ₹४० कोटी, HDFC बँकेत ₹२० कोटी अन् स्टेट बँक ऑफ इंडियात ₹१५ कोटी, म्हणजेच, एकूण ₹३१३ कोटींपेक्षा अधिक रक्कम पूर्णपणे सुरक्षित बँक डिपॉझिटमध्ये गुंतवलेली आहे.4 / 6 आजच्या काळात अनेक जण शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करतात. मात्र विजय यांची भूमिका वेगळी आहे. त्यांनी फक्त ₹१९.३७ लाख शेअर बाजारात गुंतवले आहेत. यात जयनगर प्रॉपर्टी प्रा. लि. मध्ये ₹१९.०३ लाख, इंडियन ओव्हरसीज बँकेत ₹९,६०० आणि सन पेपर मिलमधील ₹२५,००० चा समावेश आहे.5 / 6 विजय यांच्या संपत्तीमध्ये रिअल इस्टेटचा मोठा वाटा आहे. त्यांची एकूण स्थावर मालमत्ता ₹२२० कोटींची आहे. यात ₹११५ कोटींची घरे (नीलांकरई, एग्मोर, मायलापूर – चेन्नई) आणि ₹८२.८ कोटींची (कोप्पूर, शोलिंगनल्लूर) व्यावसायिक मालमत्ता सामील आहे.6 / 6 विजय यांच्याकडे ₹१३.५२ कोटींच्या गाड्या आहेत, ज्यात BMW i7, Toyota Lexus आणि Tata Caravansचा समावेश आहे. याशिवाय, त्यांच्या ताफ्यात सामान्य वापरातील Maruti Swift आणि TVS XL Super देखील आहेत. विजय यांनी एकूण ₹७५.५ कोटींचे कर्ज आणि अॅडव्हान्स दिले आहेत. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांसह शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचा समावेश आहे.