शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA Cryptocurrency: टाटा क्रिप्टोबाजारात उतरली? TATA Coin ने गेल्या २४ तासांत दिले १२०० टक्के रिटर्न, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 12:55 PM

1 / 7
शेअर बाजारात सध्या गुंतवणूकदार धडाधड विक्री करत आहेत. युक्रेनवर युद्धाचे संकट गडद होत असून रशियाने कालपासून आणखी जोर लावला आहे. युद्ध गंभीर अवस्थेत पोहोचल्याने क्रूड ऑईल, गॅस आणि सोन्याने मोठी उसळी घेतली आहे. अशा काळात एका डिसेंट्रलाईज क्रिप्टोकरंसीने देखील गेल्या २४ तासांत मोठी झेप घेतली आहे. कॉइन मार्केट कॅपने याची माहिती दिली आहे.
2 / 7
टाटा कॉईन (TATA Coin) नावाच्या या क्रिप्टोकरन्सीने मोठी झेप घेतली आहे. जवळपास १२०० टक्क्यांनी या करन्सीने गुंतवणूकदारांना मालामाल बनविले आहे. हा कॉईन आता 0.09515 डॉलर वर ट्रेड करत आहे. टाटा कॉईन ची मार्केट व्हॅल्यू सध्या 8,56,355 डॉलर आहे.
3 / 7
टाटा कॉईनचे उद्दिष्ट विकेंद्रित पैसा सुरक्षित करणे आणि गुंतवणूकदारांना तसेच जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्या आणि संस्थांना चांगली सुरक्षित पेमेंट प्रणाली प्रदान करणे हा आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून सुलभ आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याची सेवा मिळेल. यामुळे लोकांची गुंतवणूक सुरक्षित राहील, असा यांचा दावा आहे.
4 / 7
क्रिप्टोकरन्सीची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, ती जगातील सर्वात सुरक्षित जागतिक डिजिटल करन्सी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. TATA Coin ला पूर्णपणे कम्युनिटीच्या आधारे बनविण्यात आले आहे.
5 / 7
ही क्रिप्टोकरन्सी पूर्णपणे विकेंद्रित पीअर टू पीअर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे जी सरकार किंवा वित्तीय प्रणालीसारख्या कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणावर अवलंबून नाही. TATA Coin कमी फीसह जगाला, व्यापारी आणि वापरकर्त्यांना चांगला परतावा देण्याचा दावा करते.
6 / 7
हे डिजिटल चलन कोणत्याही व्यक्ती, संस्था, संस्था किंवा गट यांच्या मालकीची किंवा नियंत्रित राहणार नाही. Binance स्मार्ट चॅनलवर फक्त 90 लाख कॉईन तयार होतील. TATA Coin ही जमीन किंवा सोन्यासारखी मजबूत मालमत्ता आहे, जी लोकांना दीर्घकाळ डिजिटल स्वरूपात मूल्य साठवण्याची संधी देईल.
7 / 7
परंतू या क्रिप्टोकरन्सीचे नाव जरी टाटा असले तरी ते भारताच्या टाटा ग्रुप किंवा कंपनीशी संबंध नाही. Tata Coin ही 'You' या कंपनीच्या मालकीचे आहे.
टॅग्स :Cryptocurrencyक्रिप्टोकरन्सीTataटाटा